AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रावसाहेब दानवेंचा भाजपचा झेंडा हाती घेऊन व्हिडीओ व्हायरल, पहा व्हिडीओ

रावसाहेब दानवेंचा भाजपचा झेंडा हाती घेऊन व्हिडीओ व्हायरल, पहा व्हिडीओ

| Updated on: May 24, 2022 | 11:54 AM
Share

काल भाजपकडून पालिकेच्या कारभाराविरोधात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचे मोठे नेते आंदोलनात सहभागी झाले होते. इतकी वर्षे शिवसेनेची सत्ता असून देखील त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही अशी टीका देखील फडणवीसांनी केली.

औरंगाबाद – औरंगाबादमधील (Aurangabad) पाणी प्रश्नावर भाजपचे अनेक नेते आक्रमक झाले आहेत. काल देवेंद्र फडणवीस (Devedra Fadanvis) यांची गाडी मोर्चातून जात होती. त्यावेळी त्यांच्या गाडीला जायला रस्ता नव्हता. त्याचवेळी भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) भाजपचा झेंडा हातात घेऊन कार्यकर्त्यांना बाजूला केले.त्यामुळे फडणवीसांची गाडी तिथून जाऊ शकली. गाडी पुढे सरकरण्यास अडचण होत असल्याचे दानवे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांना बाजूला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायल झाला आहे. औरंगाबादमधील पाण्याची समस्या निर्माण झाल्यापासून शिवसेनेवरती भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. काल भाजपकडून पालिकेच्या कारभाराविरोधात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचे मोठे नेते आंदोलनात सहभागी झाले होते. इतकी वर्षे शिवसेनेची सत्ता असून देखील त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही अशी टीका देखील फडणवीसांनी केली.

Published on: May 24, 2022 11:54 AM