राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारल्याने विधानसभा अध्यक्षांचे खडेबोल, राहुल नार्वेकर यांनी दिला इशारा
VIDEO | विधानभवनाच्या पायऱ्यांवर असंसदीय वर्तन करू नका. अन्यथा..., विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काय दिला नेमका इशारा?
मुंबई : राहुल गांधी यांच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाले आहे. दरम्यान, विधानभवनातही याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांचा फोटो असलेल्या पोस्टरवर जोडे मारत सत्ताधाऱ्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे यांची शिवसेना आक्रमक होत त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं आणि विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली. या प्रकरणी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारल्याने विधानसभा अध्यक्षांचे खडेबोल सुनावले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर असंसदीय वर्तन करू नका. अन्यथा कारवाई करावी लागले, असा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. या जोडे मारो आंदोलनावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आक्षेप नोंदवला होता. तर अजित पवार यांना समर्थन देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला होता.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

