वाघ हा वाघ असतो! विजय थलापतीने निवडणुकांचं रणशिंग फुंकलं
अभिनेता विजय थलापतीने 2026 च्या तमिळनाडू निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे. निवडणुकीत डीएमके आणि भाजपसोबत युती करणार नाही असं विजय थलापती याने जाहीर केलं आहे.
अभिनेता विजय थलापतीने 2026 च्या तमिळनाडू निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे. निवडणुकीत डीएमके आणि भाजपसोबत युती करणार नाही असं विजय थलापती याने जाहीर केलं आहे. तमिळनाडूच्या मधूराईमध्ये विजय थलापतीने विराट जनसभा घेऊन ही घोषणा केली आहे.
दक्षिणेच्या राजकारणात अभिनेता विजयची घोषणा. 2026 ला एकटा लढणार, भाजपशी युती करणार नाही. अभिनेता मधूराईच्या रॅलीमध्ये झालेल्या प्रचंड गर्दीने सर्वांचं लक्ष वेधल. त्यामुळे तमिळमध्ये आणखी एका अभिनेत्याच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली आहे. मधूराईच्या रॅलीत विजयने एकटं लढण्याची घोषणा केली. भाजप हा वैचारिक तर डीएमके हा राजकीय शत्रू असल्याचं म्हणत त्यांच्याशी युती करणार नाही असंही विजयने यावेळी जाहीर केलं. तर तमिळनाडूला मोदींनी काहीही दिलं नसल्याचाही आरोप अभिनेता विजय थलापतीने केला आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

