AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar Full PC| ओबीसी आडनावासंदर्भात ग्रामपंचायतीची मदत घेऊ | OBC Reservation -tv9

Vijay Wadettiwar Full PC| ओबीसी आडनावासंदर्भात ग्रामपंचायतीची मदत घेऊ | OBC Reservation -tv9

| Updated on: Jun 13, 2022 | 9:04 PM
Share

ओबीसी आडनावासंदर्भात ग्रामपंचायतीची मदत घेऊ असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सरकारची भूमिका मांडली

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप होत असताना आता नव्या वादाला तोंड फुचण्याची शक्याता आहे. तसेच या प्रकरणामुळे ओबीसी आरक्षणाला पुन्हा खो लागतो की काय असा प्रश्न पडत आहे. कारण ओबीसींचा इम्पेरिकल डेटा (OBC Empirical data)हा योग्य पध्दतीने गोळा केला जात नाही असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यानंतर याप्रकरणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारची भूमिका मांडली आहे. तसेच ते म्हणाले, फडणवीस यांच्या मताशी मी सहमत आहे. आणि ही बाब सरकारच्याही लक्षात आलेली आहे. त्यामुळे आता आम्ही सुधारणा करु. यात नक्की बदल होईल. तसेच कोण कुठल्या जातीचा आहे, त्याचे अडनाव कसे आहे याची माहिती ही ग्रामपंचायतीकडे असते. त्यामुळे आम्ही ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार होत असताना ग्रामपंचायतीची मदत घेऊ.

 

Published on: Jun 13, 2022 09:04 PM