Vijay Wadettiwar Uncut | माझं काहीही होवूदेत, ओबीसीच्या मुद्यावर शांत बसणार नाही – विजय वडेट्टीवार

आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री वडेट्टीवार,भाजपा नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अभावानेच दिसणारं चित्रं लोणावळ्यात पहायला मिळालं.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काल भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी आंदोलन केलं. त्यानंतर आज लोणावळ्यात ओबीसींची परिषद (OBC conference) भरलीय. त्यातही सर्व पक्षाते ओबीसीचे नेते एकत्र आलेले आहेत.आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री वडेट्टीवार,भाजपा नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अभावानेच दिसणारं चित्रं लोणावळ्यात पहायला मिळालं. ह्या नेत्यांच्या भाषणातखरं मन जिंकलं ते वडेट्टीवारांनी. त्यांनी स्वत:च्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर मनातली खदखद बोलून दाखवली. सोबत विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही साद घातली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI