Vijay wadettiwar : जरांगे लहान वयातील बाल्या, त्याला अशीच भाषा कळते, त्याची बुद्धी…; वडेट्टीवारांची जिव्हारी लागणारी टीका
विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ओबीसीच्या तपासणीत निष्काळजीपणा झाल्याचा दावा करत, मराठा तरुण दाखवून ओबीसी तरुणांच्या खुनाचा आरोप त्यांनी केला. सरकार जरांगे पाटलांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण घालवू पाहत असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.
दिल्लीचा लाल्या मराठ्यांना लक्ष्य करायला सांगतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत राहुल गांधींवर हल्लाबोल केला. तर विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना लहान वयातील बाल्या संबोधले. “जशी जरांगेंची बुद्धी, तशीच त्यांची वृत्ती आहे,” असे वडेट्टीवार यांनी म्हटले. जरांगेंच्या बालिश बुद्धीमुळेच त्यांना असे शब्द सुचतात, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
यावेळी आरक्षणासंदर्भात वडेट्टीवारांनी भाष्य केले. ओबीसीच्या संदर्भातील तपास वेगाने होत असला तरी, मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या प्रकरणांचा तपास योग्य प्रकारे झाला नाही, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले. सरकारने केवळ मदत देण्याचे धोरण स्वीकारले पण चौकशी केली नाही. वडेट्टीवार यांनी सरकारवर ओबीसीवरचे प्रेम दाखवत असल्याचा आरोप करत, अनेक ठिकाणी मराठा दाखवून ओबीसी तरुणांचा खून केला गेला असे गंभीर विधान केले. वृत्तपत्रांमध्ये हे प्रकरण पुढे आल्यानंतरही त्याची चौकशी झाली नाही. सरकारने जरांगे पाटलांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण घालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
शिंदे म्हणाले, बिहारच्या लाडक्या बहिणींनी दिली लँडस्लाईड व्हिक्ट्री..
सुळेंकडून नितीशबाबूंचं कौतुक! बिहार निकालावर राज्यात कोण-काय म्हणालं?
भाजप नंबर1 चा पक्ष तरी नितीश कुमार CM होते अन् राहणार, JDUचा मोठा दावा
'ही' 5 कारणं ज्यामुळं बिहारमध्ये NDAची हवा, विजयामागे मोदींचा करिष्मा

