AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये तलवारी घेऊन गावगुंडांचा हैदोस

Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये तलवारी घेऊन गावगुंडांचा हैदोस

| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 5:36 PM
Share

धक्का लागल्याच्या कारणावरुन उल्हासनगरात गावगुंडांनी भररस्त्यात नंग्या तलवारी नाचवत हैदोस घातल्याची घटना उघडकीस आली आहे. हैदोस घालत एका तरुणावरही या गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कमल कजानिया असं या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.

कमल कजानिया हा तरुण शुक्रवारी रात्री सेक्शन 17 मध्ये चहा पिण्यासाठी आला होता. याचवेळी कमलचा एक तरुणाला चुकून धक्का लागला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून गावगुंडांच्या टोळक्याने थेट नंग्या तलवारी नाचवत कमल याच्यावर हल्ला चढवला. या घटनेत कमल हा गंभीर जखमी आला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी फक्त मारहाणीचा किरकोळ स्वरूपाचा जामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे उल्हासनगरात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळतंय.

उल्हासनगरात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळतंय. उघडपणे गावगुंड तलवारी, घातक हत्यारे खुलेआम नाचवताना दिसतात. क्षुल्लक कारणावरुन जीवघेणे हल्ले करणे यासारख्या घटना वारंवार घडताना दिसतात. कायद्याने गुन्हा असतानाही तरुण हातात हत्यारे घेऊन फिरताना दिसतात. पोलीस प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे गुंडांचा हैदोस वाढल्याचे दिसतेय.