Vinayak Mete | मराठा समाज मागास ठरवण्यासाठी नवा आयोग नेमणार : विनायक मेटे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 07, 2021 | 6:05 PM

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी या बैठकीनंतर दिली

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज महत्वाची बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी या बैठकीनंतर दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विनायक मेटे, मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि अन्य सचिव उपस्थित होते.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. सर्व प्रक्रिया तपासून मागासवर्गीय आयोग स्थापन करु असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं मेटे म्हणाले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील फेरविचार याचिकेवरही या बैठकीत चर्चा झाली. तसंच भरती प्रक्रियेत मार्ग काढला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं मेटे म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI