Vishakha Raut | ठाकरे सेनेला मुंबईत मोठा धक्का! विशाखा राऊतांची याचिका हायकोर्टाने फेटाळली; थेट नगरसेवकपदावरच टांगती तलवार
मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत यांची याचिका फेटाळल्याने त्यांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यामुळे हे पद धोक्यात आले आहे. प्रिया सरवणकर यांना हे पद मिळण्याची शक्यता आहे. याआधीही मुंबईत चार नगरसेवकांची पदे रद्द झाली आहेत.
एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे सेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले होते, ज्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
या निर्णयानंतर प्रिया सरवणकर यांना नगरसेवकपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशाखा राऊत यांचे जातीचे प्रमाणपत्र 14 डिसेंबर 2025 रोजी काढले असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे आधीपासून जातीचे प्रमाणपत्र नव्हते, तसेच त्यांच्या घरातही कोणाकडे जातीचे प्रमाणपत्र नाही. हे प्रमाणपत्र त्यांनी निवडणुकीसाठी काढले होते.
मुंबई महानगरपालिकेत आतापर्यंत एकूण 227 पैकी चार नगरसेवकांची पदे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये एमआयएमचे रोशन शेख (प्रभाग 138), ठाकरे सेनेचे दीपक राजाराम सावंत (प्रभाग 111), एमआयएमचे शमीर रमजान पटेल (प्रभाग 137) आणि राष्ट्रवादीच्या बुशरा कप्तान मलिक (प्रभाग 170) यांचा समावेश आहे. या पदांवर अद्याप नवीन नावांची घोषणा झालेली नाही.
Published on: Sep 03, 2026 10:12 AM
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...

