उद्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदान, जाणून घ्या दिवसभरातील अपडेट
पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार असून ५ मतदार संघातील निवडणुकीकडे राज्यातील जनतेचं लक्ष
पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार असून ५ मतदार संघातील निवडणुकीकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागले आहे. सत्यजित तांबे यांना भाजपकडून अद्याप अधिकृत कोणताही पाठिंबा जाहीर झालेला नाही. असे असले तरी सत्यजित तांबे यांनी निवडून आणण्यासाठी कामाला लागा, पक्ष श्रेष्ठींनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. तर जयदत्त क्षीरसागर यांचा भाजपच्या किरण पाटील यांना पाठिंबा असल्याने मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विक्रम काळे यांना धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी मुलगा श्रीकांत शिंदे यांची कल्याण-डोंबिवलीतील जागा राखली तरी पुरे, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. लोकसभेच्या ४० जागा जिंकणार असल्याचाही दावा त्यांनी केला. मविआकडे युतीबाबत कोणताही प्रस्ताव नसताना वंचित चर्चा काय करायची? असे विधान करत शऱद पवार यांनी प्रकाश आंबेडकरांना खोचक टोला लगावल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले माझी युती ठाकरेंसोबत, इतरांशी देणंघें नाही, असे म्हणत पलटवार केला आहे. तर यासह जाणून घ्या, दिवसभरातील ताज्या घडामोडी…
Published on: Jan 29, 2023 08:44 AM
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
