AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE Vote Counting of Assembly Election Results 2026 | 5 राज्यांचा सुपरफास्ट निकाल पहा फक्त tv9marathi वर

LIVE Vote Counting of Assembly Election Results 2026 | 5 राज्यांचा सुपरफास्ट निकाल पहा फक्त tv9marathi वर

| Updated on: May 04, 2026 | 8:42 AM
Share

LIVE Vote Counting of Assembly Election Results 2026 in Marathi, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सध्या पोस्टल मतांची मोजणी सुरू आहे. ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघात आघाडीवर आहेत,भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जीं आघाडीवर तर सुवेंधु अधिकारी हे पिछाडीवर. नंदीग्राममधून मात्र सुवेंधु आघाडीवर आहेत. अधिकारी 2 मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांची थेट लढत आहे.

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सध्या पोस्टल मतांची मोजणी सुरू आहे. यामध्ये काही ठिकाणी भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः आसाममध्ये पोस्टल मतमोजणीत भाजप आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी येथील मतमोजणीही सुरू झाली आहे. काही वेळातच ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल स्पष्ट होऊ लागतील. पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे देशाचे विशेष लक्ष लागले आहे. येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार टीएमसी सुमारे 45 जागांवर आघाडीवर असून, भाजप सुमारे 52 जागांवर आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघात आघाडीवर आहेत,भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जीं आघाडीवर तर सुवेंधु अधिकारी हे पिछाडीवर. नंदीग्राममधून मात्र सुवेंधु आघाडीवर आहेत. अधिकारी 2 मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांची थेट लढत आहे. एकूणच, सुरुवातीच्या कलांमुळे राजकीय चित्र रंगतदार बनले असून, पुढील काही तासांत अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे.

 

 

Published on: May 04, 2026 08:36 AM
Follow Us