VIDEO : Mulund | मुलुंडचा सोनापूर रस्ता पाण्याखाली, गुडघाभर पाणी साचलं

मुलुंडचा सोनापूर रस्ता पाण्याखाली गेला आहे. गुडघाभर पाणी रस्त्यावर साचलं आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तब्बल 20 मिनिटे उशिराने लोकल धावत होती.

आजही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पावसामुळे अनेक भागांत पाणी साचतंय. नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. तर रेल्वेसेवेवर देखील पावसाचा परिणाम होतोय. आज सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे, वाहतूक सेवेवर आणि मुंबई लोकलवर त्याचा कसा परिणाम झाला आहे.

तर मुलुंडचा सोनापूर रस्ता पाण्याखाली गेला आहे. गुडघाभर पाणी रस्त्यावर साचलं आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तब्बल 20 मिनिटे उशिराने लोकल धावत होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI