द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा नाही – संजय राऊत
"राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत देशात वेगवेगळे मतप्रवाह आहेत, ते उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतले. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या पहिल्या आदिवासी उमेदवार आहेत"
मुंबई: “राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत देशात वेगवेगळे मतप्रवाह आहेत, ते उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतले. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या पहिल्या आदिवासी उमेदवार आहेत. यावर चर्चा झाली. महाराष्ट्रात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेनेत आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते, आमदार आहेत. आम्ही चर्चा केली, त्यांची मत समजून घेतली. निर्णय उद्धव ठाकरे घेतील. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा नाही” असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
Published on: Jul 12, 2022 02:39 PM
Follow Us
Latest Videos
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...

