Chipi Airport | पाण्याचे फवारे उडवत चिपी विमानतळावर विमानाचं स्वागत

मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी पाण्याचे फवारे उडवत विमानाचे स्वागत करण्यात आले.

सिंधुदुर्ग : कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थित होते. तत्पूर्वी उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिपी विमानतळ आगमन झाले. मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी पाण्याचे फवारे उडवत विमानाचे स्वागत करण्यात आले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI