Budget 2022 | अर्थसंकल्पात नेमकं काय स्वस्त झालं आहे?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण ( Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Budget 2022) अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण ( Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Budget 2022) अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच यंदाच्या बजेटमध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नोकरदारांच्या पदरी निराशा आली आहे. या शिवाय कृषी क्षेत्रावर या अर्थसंकल्पात विशेष फोकस करण्यात आला असून त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. या शिवाय कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर हेल्थ सेक्टरवरही या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. या शिवाय अर्थमंत्री सीतारामण यांनी काही केमिकल्सवरील कस्टम ड्युटी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मिथेनॉलचा समावेश आहे. देशांतर्गत मॅन्यूफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
काय स्वस्त होणार
- चामडे
- बूट
- चपला
- विदेशी सामान
- कपडे
- शेतीशी संबंधित वस्तू
- पॅकेजिंग डब्बे
- पॉलिश केलेले डायमंड
- परदेशी छत्र्या
- मोबाईल फोन
- मोबाईल चार्जर
- जेम्स अँड ज्वेलरी
Published on: Feb 01, 2022 02:45 PM
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

