बारामतीमध्ये अजित पवार यांना धास्ती कुणाची? कार्यक्रमाला अनुपस्थितीत, कुणी केला कार्यक्रमाचा शुभारंभ?
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गळीप हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, अजित पवार यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले. गळीप हंगामाच्या पूजेच्यावेळी महिलांनी आंदोलन केले. यावेळी या महिला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
बारामती | 28 ऑक्टोबर 2023 : बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आज शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होता. मात्र, या कार्यक्रमाला अजित पवार यांनी उपस्थित राहणे टाळले. सकल मराठा समाजाने गावबंदी करून या कार्यक्रमाला विरोध केला. त्यामुळे अजित पवार यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावणे टाळले. सकल मराठा समाजाने आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे माळेगाव कारखाना परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे संचालक मंडळाने अखेर कारखान्याचे शेतकरी सभासद आणि मराठा आंदोलनकर्त्या महिला यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पाडला.
Published on: Oct 28, 2023 10:05 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
