Special Report | मनसेची डॅशिंग लेडी रुपाली पाटील कशामुळे नाराज?

मनसेच्या रुपाली ठोंबरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसेच रुपाली ठोंबरेंच्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेत दोन गट पडल्याची चर्चाही केली जातेय.

मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून काम करत आहे. पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय नाही.परंतु पक्षातील रिकामटेकड्या मंडळींचा होत असलेला त्रास, मला नवीन पर्याय शोधण्यास भाग पाडू शकतो. जवळचे हितचिंतकच माझ्याविरोधात पक्ष प्रमुखांचे कान भरून लागल्याचा आरोप मनसे पुण्याच्या शहर उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. मनसेच्या रुपाली ठोंबरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसेच रुपाली ठोंबरेंच्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेत दोन गट पडल्याची चर्चाही केली जातेय. महाराष्ट्राच्या राजकारणात स्त्रियांना टार्गेट केलं जाते, तेच आता मनसेत माझ्याबाबत घडत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. मला पक्ष बदलायचा असता तर तो मी 2017 ला भाजपची खुली ऑफर असतानाच बदलाला असता. त्यानंतर २०१९ ला माझे तिकीट कापण्यात आले तेव्हाही मी पक्ष बदलाचा निर्णय घेऊ शकले असते पण मी तसे काहीही केलेले नाही. पण आज पक्षातील हितचिंतकच मनसे प्रमुखांचे कान भरत आहेत. राज ठाकरेंचे कान भरणाऱ्याची नावे व माहिती माझ्याकडे आहे. वेळ आल्यावर त्यांची नावे नक्कीच जाहीर करणार असल्याचेही रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI