मराठ्यांना आरक्षण का मिळणार नाही?; गुणरत्न सदावर्ते यांचा नवा दावा काय?
गुणरत्न सदावर्ते यांनी नवा दावा केलाय. मराठ्यांना आरक्षण मिळणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर मराठा मागास आहेत, असा कोणत्याच आयोगाचा निर्णय नाही, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे. तर मागास म्हणून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, असे सदावर्ते म्हणाले.
मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण द्यावे, यासाठी मनोज जरांगे यांनी आपला लढा कायम ठेवलाय. अशातच गुणरत्न सदावर्ते यांनी नवा दावा केलाय. मराठ्यांना आरक्षण मिळणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर मराठा मागास आहेत, असा कोणत्याच आयोगाचा निर्णय नाही, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे. तर मागास म्हणून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, असे सदावर्ते म्हणाले. तर मराठा समाज हा गायकवाड आयोगाने मागास ठरवला होता मात्र तो सर्वोच्च न्यायालयाने नाकारला. तोच समाज तीच व्यक्ती पुन्हा आपण वेगळ्या घटकात मी मागास आहे, असं म्हणणं आणि असं मान्य करणं हे चुकीच आहे, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
Latest Videos
Latest News