Kolhapur | कोणत्याही परिस्थितीत कामावर येणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत कामावर हजर राहणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. इतकच नाही तर विलीनीकरणाच्या बाबतीत न्यायालयाच कारण देत परिवहन मंत्री कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी केला. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 11, 2021 | 5:12 PM

निलंबनाच्या कारवाईच्या बडगा उभारून सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही.. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी या संपकरी कर्मचाऱ्यांना आता शेवटचा अल्टीमेटम दिलाय.. मानवतेच्या दृष्टिकोनातून सोमवार पर्यंतची मुदत देत असून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केलय.. मात्र कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी हे आवाहन धुडकावून लावलय.. जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत कामावर हजर राहणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. इतकच नाही तर विलीनीकरणाच्या बाबतीत न्यायालयाच कारण देत परिवहन मंत्री कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी केला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें