AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं महाराष्ट्रात निर्बंध आणखी वाढणार? -Tv9

Special Report | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं महाराष्ट्रात निर्बंध आणखी वाढणार? -Tv9

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 9:37 PM
Share

राज्यातील कोरोना प्रादुर्भाव वाढलेल्या शहरातील शाळा बंद (School Closed) करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी शहरांचा समावेश आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा वाढलाय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजार पार गेलाय. ओमिक्रॉन विषाणूची (Omicron Variant) लागण झालेल्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. अशावेळी राज्यातील कोरोना प्रादुर्भाव वाढलेल्या शहरातील शाळा बंद (School Closed) करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी शहरांचा समावेश आहे.

मुंबईतील शाळा बंद होणार

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.

Published on: Jan 03, 2022 09:37 PM