AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर

उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर

| Updated on: Jul 16, 2026 | 2:27 PM
Share

NEET पेपरफुटी प्रकरण समोर येताच मोठी खळबळ उडाली होती. या पेपरफुटीत अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न पायदळी तुवडवली गेली. या पेपरफुटीनंतर अनेक ठिकाणी आक्रोश व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर नवख्याच उदयास आलेल्या सीजेपी ने आंदोलनाला सुरुवात केली.

NEET पेपरफुटी प्रकरण समोर येताच मोठी खळबळ उडाली होती. या पेपरफुटीत अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न पायदळी तुवडवली गेली. या पेपरफुटीनंतर अनेक ठिकाणी आक्रोश व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर नवख्याच उदयास आलेल्या सीजेपी ने आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक हे 19 दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाची चर्चा महाराष्ट्रातही आहे कारण, उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी CJP च्या या आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला आहे.

याबाबत स्वतः सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सांगितले की, “ठाकरे सर हे वारंवार आमच्या आंदोलनाबाबत विचारतात. ते म्हणतात काहीही आवश्यकता असले तर आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, तुम्ही युवकांसाठी लढत आहात.” पुढे दीपके याने सांगितले की, ठाकरे सर रोज फोन करून सोनम वांगचुक यांच्याही प्रकृतीची विचारपूस करत असतात. त्यांही सोनम सरांना उपोषण सोडण्यासाठी विनंती केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? या प्रश्नावर अभिजीत दीपके यांनी निश्चिती दिली नाही. त्यांनी सांगितले की, हे ते ठरवतील आणि त्यांचा विचार सांगतील

Published on: Jul 16, 2026 02:27 PM

Follow Us