AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde | महिलांना काम करुन घेण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतात : पंकजा मुंडे

Pankaja Munde | महिलांना काम करुन घेण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतात : पंकजा मुंडे

| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 4:50 PM
Share

नाशिकमध्ये नामको बँकेच्या लोकार्पण सोहळ्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. आमच्याकडे सहकारमध्ये खूप राजकारण आहे. भुजबळांनी ते भोगलं, पण राजकारण बाजूल ठेवलं, तर सहकार यशस्वी होतं, असा दावा मुंडे यांनी यावेळी केला.

नाशिकमध्ये नामको बँकेच्या लोकार्पण सोहळ्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. आमच्याकडे सहकारमध्ये खूप राजकारण आहे. भुजबळांनी ते भोगलं, पण राजकारण बाजूल ठेवलं, तर सहकार यशस्वी होतं, असा दावा मुंडे यांनी यावेळी केला. पंकजा म्हणाल्या की, भुजबळ हे माझ्यासाठी जेष्ठ मार्गदर्शक आहेत. माझा आणि भुजबळांचा कार्यक्रम घड्याळाच्या काट्यावर सुरू होतो. प्रमोद महाजन आणि मुंडे यांच्यामुळे मी 35 ते 40 मिनिटांचे भाषण करू शकते. खरे तर बँका कशा यशस्वी होतात याबाबत आश्चर्य वाटतं. आमच्याकडे पाणी प्यायलाचं असतं. यंदा या पाण्यानं मोठं नुकसान केलं. सहकारमध्ये खूप राजकारण आहे. भुजबळांनी ते भोगलं. पण राजकारण बाजूल ठेवलं, तर सहकार यशस्वी होतं. माझा कारखाना कर्जबाजारी आहे. बँक चालवणं अवघडय. आम्हाला हो म्हणायची सवय. बँकेत नो म्हणावं लागतं. नोटाबंदी झाली तेव्हा बँकांची काय परिस्थिती होईल असं वाटत होतं, पण 2 वर्षांनी सगळं स्थिर स्थावर झालं. यासाठी त्यांनी लोकांना सॅल्यूट केला. भुजबळ साहेब आपण अशा वर्गातून येतो जिथे संघर्ष केल्याशिवाय, खेचून घेतल्याशिवाय काही मिळत नाही असा उल्लेखही त्यांनी एकेठिकाणी केला.

Published on: Nov 01, 2021 04:29 PM