Special Report | स्मृती इराणींविरोधात राष्ट्रवादी,काँग्रेसचं आंदोलन
दोन्ही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यावेळी महिला काँग्रेसच्या सदस्यांना पोलिसांनी आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने उचलून आणल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला.
पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani)आज पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्या या दौऱ्याला विरोध करत महिला काँग्रेस (Woman Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी आंदोलन केलं. महिला काँग्रेसच्या सदस्यांनी महागाईच्या विरोधात चूल आणि बांगड्या घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलन (Andolan)केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होताच जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भाजपचा कार्यक्रम काही वेळ थांबवावा लागला. तर यानंतर दोन्ही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यावेळी महिला काँग्रेसच्या सदस्यांना पोलिसांनी आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने उचलून आणल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला. तर बालगंधर्व रंगमंदिराजवळ घोषणाबाजी केल्यानंतर आपल्याला भाजपच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनीही मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

