योगी बाबा 300 के पार, फिर से योगी सरकार, कार्यकर्त्यांची बॅनरबाजी
उत्तर प्रदेशात भाजपनेही बहुमताचा आकडा गाठलेला दिसत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सत्ता राखण्यात भाजप यशस्वी झाल्याचं दिसत आहे.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब (punjab), उत्तराखंड (uttarakhand) आणि मणिपूर (manipur) या पाच राज्यातील निवडणुकीचे कौल हाती येत आहेत. काही राज्यात उलथापालथ होताना दिसत आहे. तर काही राज्यात आपली सुभेदारी वाचवण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी होताना दिसत आहेत. पंजाबमध्ये तर आम आदमी पार्टी बहुमताच्या पार गेल्याचं सुरुवातीच्या कलावरून दिसत आहे. तीच स्थिती उत्तर प्रदेशातही आहे. उत्तर प्रदेशात भाजपनेही बहुमताचा आकडा गाठलेला दिसत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सत्ता राखण्यात भाजप यशस्वी झाल्याचं दिसत आहे. यामुळे भाजपा कार्यकर्तांनी योगी बाबा 300 के पार, फिर से योगी सरकार असे पोस्टर लावले आहेत.
Published on: Mar 10, 2022 11:32 AM
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
