AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh मध्ये 25 March ला योगी सरकारचा संध्याकाळी 4 वाजता होणार शपथविधी

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 2:24 AM
Share

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याची राजधानी लखनऊ येथील एकना स्टेडियममध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यासोबतच कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे.

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक (UP Assembly Election result 2022)जिंकत योगींनी पुन्हा सत्ता काबीज केलीय. आता वेध लागलेत उत्तर प्रदेशात पुन्हा सरकार स्थापन करण्याचे, उत्तर प्रदेशात योगी कोणत्या तारखेला सरकार स्थापन करतील, यांच्या संभाव्य तारखाही समोर आल्या आहे. एक वृत्तवाहिनीने 25 मार्चला योगींचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी (Yogi Adityanath Oath ceremony) होणार असल्याची माहितीही सुत्रांच्या हवाल्याने दिलीय. योगी आदित्यनाथ मीडिया रिपोर्ट्सनुसार, योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Modi), गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अनेक केंद्रीय कॅबिनेट मंत्री उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याची राजधानी लखनऊ येथील एकना स्टेडियममध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यासोबतच कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे.