हुल्लडबाजी जीवावर बेतणार? तलाव परिसरात भर पाण्यात उतरले तरूण अन्…. बघा व्हिडीओ
चांदापूर येथील तलावावर काही हौशी तरुण मंडळी हुल्लडबाजी करताना दिसून येत आहे. आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी तरुण दिसून येतायत. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही यंत्रणा इथे कार्यान्वित नाही, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यातील परळीच्या चांदापूर तलाव परिसरात तरूणांची हुल्लडबाडी पाहायला मिळत आहे. एकीकडे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परळी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र मुसळधार पावसामुळे पाणी प्रकल्पावर हौशी तरुण मंडळींची हुल्लडबाजी देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, ही हुल्लडबाजी या तरूणावर बेतण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधा पावसामुळे परळीतील नदी, नाले, तलाव ओसंडून वाहताय. परळी तालुक्यात काल सायंकाळपासून दमदार सुरू असलेल्या पावसाने प्रमुख पाणी प्रकल्प ओसंडून वाहत आहे. नागापूर येथील वाण धरण, बोरणा मध्यम प्रकल्प आणि चांदापूर येथील तलाव ओसंडून वाहत आहे. त्यामुळे परळीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. मागील आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाने मुख्य पाणीपुरवठा करणारे प्रकल्प ओसंडून वाहत आहे.
Published on: Aug 25, 2024 01:53 PM
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
