दुर्गा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी शेकडो कार्यकर्ते दाखल, उद्धव ठाकरे निःशब्द तर रश्मी ठाकरे…
VIDEO | ठाण्यात काल महाविकास आघाडीच्या जनआक्रोश मोर्चात घोषणाबाजी करताना युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन
मुंबई : ठाण्यात काल महाविकास आघाडीच्या जनआक्रोश मोर्चात घोषणाबाजी करताना युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईत पेडर रोड येथे त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पेडर रोड परिसरात दुर्गा यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबाकडून दुर्गा यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं. यावेळी रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. दुर्गा भोसले यांच्या सारख्या पदाधिकाऱ्यांचं निधन ही पक्षाची मोठी वैयक्तिक हानी असल्याचं मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केलं जात असताना अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी

