सोयाबीनची पेरणी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे करा, दुबार पेरणीचे संकट टाळा, कृषी विभागाचा सल्ला

महाराष्ट्रात यंदा मान्सून पाऊस यंदा वेळे आधी दाखल झालेला आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. आंबेजोगाई तालुक्यात 77 हजार 152 हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. Soybean Farming

सोयाबीनची पेरणी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे करा, दुबार पेरणीचे संकट टाळा, कृषी विभागाचा सल्ला
सोयाबीन पेरणी बीबीएफ तंत्रज्ञान
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 5:43 PM

संभाजी मुंडे,टीव्ही 9 मराठी, अंबाजोगाई बीड: महाराष्ट्रात यंदा मान्सून पाऊस यंदा वेळे आधी दाखल झालेला आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. आंबेजोगाई तालुक्यात 77 हजार 152 हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. सध्या 22 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी पूर्ण झाली आहे. पुढील आठ दिवसात शंभर टक्के पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला गेलाय. (Agriculture Department said farmers use BBF technology for soybean seed bowing)

बीड जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दाखल झालाय. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे. परंतु असं असताना शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असं आवाहन देखील कृषी विभागाकडून केलं जातंय. अंबाजोगाई तालुक्यात 45 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालीय. सोयाबीनचे क्षेत्र जास्त असल्याने दुबार पेरणी टाळायची असेल तर बीबीएफ तंत्रज्ञानावर सोयाबीनची पेरणी करण्यात यावी, असं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.

बीबीएफ तंत्रज्ञान नेमकं काय?

सोयाबीन रुंद वरंबा सरी पद्धतीनं बीबीएफ पद्धतीनं घेण्यात यावं. चार ओळीनंतर एक ओळ रिकामी सोडून बळीराम नांगर हाणायचा. पाऊस कमी पडला तरी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे पेरणी करण्यात आलेलं पीक तग धरुन राहतं, असं कृषी अधिकारी राजाराम बरवे यांनी दिली.

बीज प्रक्रिया करण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून घ्यावी, जेणेकरून फवारणी अधिक वेळ करावी लागणार नाही. त्याबरोबरच तालुक्यात कोणत्याही बी-बियाणं आणि खताचा तुटवडा नसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी राजाराम बरवे यांनी दिलीय.

75 ते 100 मिमी पावसाशिवाय पेरणी करु नका

गेल्या काही दिसांपासून सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला नाही आणि लगेच मॉन्सून देखील आला. निसर्गाच्या या खेळात शेतकऱ्यांचे मात्र अनेक वेळा हाल होतात तर कधी मदतही होते. . सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे.  शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

नाशिक पुणे सेमीहायस्पीड रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, वाकी बुद्रुकचे शेतकरी आक्रमक

नारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय

(Agriculture Department said farmers use BBF technology for soybean seed bowing)