Agriculture News : कांद्याला उत्पादन खर्च निघेल इतका बाजार भाव मिळत नसताना, पण आता कांद्याचंही उत्पन्न घटणार कारण

Agriculture News : कांदा पिकाला उत्पन्न खर्च काढणाराही भाव नाही, आणि आता कांदा आणि इतर पिकांवर हे संकट

Agriculture News : कांद्याला उत्पादन खर्च निघेल इतका बाजार भाव मिळत नसताना, पण आता कांद्याचंही उत्पन्न घटणार कारण
Agriculture News
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 30, 2023 | 11:14 AM

उमेश पारीक, नाशिक : कांद्याची नागरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव (lalasgaon) शहरासह परिसरात धुक्याच्या चादरीने पागरून घातल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. थंडीनंतर दाट धुके पसरले असून या दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे लासलगाव मध्ये दिसत होते. या दाट धुक्यांच्या चादरीतून वाहनधारक वाट काढत होते, तर थंडीनंतर या दाट धुक्यामुळे शेती (nashik farmer) पिकांवर परिणाम होणार आहे आधीच कांद्याला उत्पादन (Onion production) खर्च निघेल इतका बाजार भाव मिळत नसताना या दाट धुक्यामुळे कांदा पिकावर करपासह अन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार असल्याने परत एकदा बळीराजाला नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. बळीराजा अश्या दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र लासलगाव येथे दिसत आहे.


महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुके पडायला लागल्यापासून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाहनांच्या रांगाचं रांगा पाहायला मिळत आहेत. धुक्यामुळे वाहनांना दिवसा लाईट लावावी लागत आहे. त्याचबरोबर सध्याच्या धुक्याचा शेतकऱ्यांच्या पीकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. कांदा पीकावर अधिक परिणाम होईल, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.