शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाची कमाल; एकरी १२० टन ऊस उत्पादन!

यंदा सर्वत्र दुष्काळाची झळ बसत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामतीत मात्र एआय तंत्रज्ञानामुळे ऊसशेतीत मोठी झेप घेण्यात आली आहे. १५ वर्षांच्या सरासरी उत्पादनात एकरी ६० टनांची वाढ झाली आहे.

शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाची कमाल; एकरी १२० टन ऊस उत्पादन!
sharad pawar
| Updated on: Nov 22, 2026 | 11:16 PM

 विक्रम वरे, टिव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये प्रभावी वापर केल्यास उत्पादनात मोठी वाढ साधता येऊ शकते, याचा प्रत्यय बारामतीतील गोविंद बाग येथे आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून गोविंद बागेत यंदा एकरी सरासरी १२० टन ऊस उत्पादन मिळाले आहे. गेल्या १५ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत एकरी तब्बल ६० टनांची वाढ झाल्याने AI आधारित शेती प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे.

शेतीमध्ये बदलते हवामान, पाण्याचे नियोजन, खतांचा संतुलित वापर, पिकांवरील रोग-किडींचा प्रादुर्भाव आणि जमिनीची सुपीकता या बाबी उत्पादनावर मोठा परिणाम करतात. या सर्व घटकांचा अभ्यास करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. गोविंद बागेत ऊस पिकासाठी या आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्याने उत्पादनवाढीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

Loading...

सकारात्मक परिणाम दिसून आला

गेल्या १५ वर्षांतील गोविंद बागेच्या ऊस उत्पादनाचा सरासरी आकडा एकरी सुमारे ६० टन होता. मात्र, AI तंत्रज्ञानाच्या मदतीने यंदा एकरी सरासरी १२० टन उत्पादन मिळाले असून, पूर्वीच्या उत्पादनाच्या तुलनेत दुप्पट वाढ नोंदविण्यात आली आहे. यामुळे पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती अधिक उत्पादक आणि फायदेशीर होऊ शकते, हे अधोरेखित झाले आहे.

ऊसशेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास पाण्याची बचत, खतांचा योग्य वापर, पीक व्यवस्थापनातील अचूकता आणि उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. गोविंद बागेतील हा प्रयोग बारामतीसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीची नवी दिशा देणारा ठरू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us