Power Supply : पावसाने उघडीप देताच वीजेचा वापर वाढला, वाढत्या वीज वापरावर ‘भार’ कशाचा?

| Updated on: Aug 02, 2022 | 10:15 AM

वाढत्या उन्हाच्या झळाबरोबर राज्यात विजेचा वापर देखील दरवर्षी हा वाढतोच. उन्हाळ्यात सरासरी दिवसाकाठी 28 हजार मेगावॅटची मागणी असते. तर पावसाळ्यामध्ये 17 हजार मेगावॅटपर्यंतची मागणी होते. त्यामुळे मागणी घटली असली तरी सध्याच्या वातावरणातील बदलामुळे विजेची मागणी ही वाढत आहे. जूनचा पंधरवाडा ओलांडला की विजेच्या मागणीत घट झाली होती. 14 हजार मेगावॅटवर मागणी आली होती.

Power Supply : पावसाने उघडीप देताच वीजेचा वापर वाढला, वाढत्या वीज वापरावर भार कशाचा?
पावसाने उघडीप देताच विजेच्या मागणीत वाढ झाली आहे,
Follow us on

मुंबई : गेल्या 8 दिवसांपासून मुंबईसह (Rain) राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. ही दिलासादायक बाब असली तरी वाढत्या उकाड्यामुळे विजेच्या वापरातही वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील दैनंदिन (Power Supply) वीज वापरात तब्बल 4 हजार मेगावॅटने मागणी वाढली आहे. ही केवळ मुंबईतील स्थिती नाही तर संपूर्ण राज्यात अशीच अवस्था आहे. पावसाने उघडीप दिली तरी (Temperature Increase) उकाडा वाढल्याने विजेचा वापरही वाढला असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. कारण राज्यात दिवसाकाठी 17 हजार मेगावॅटच्या विजेचा वापर होतो मात्र, गेल्या चार दिवसांपासून 21 हजार मेगावॅटवर वापर गेला आहे. त्यामुळे पावसाने उसंत दिली आणि वीज कडाडली असेत म्हणण्याची वेळ आली आहे.

उन्हाळ्याच्या तुलनेत निम्म्याने वापर

वाढत्या उन्हाच्या झळाबरोबर राज्यात विजेचा वापर देखील दरवर्षी हा वाढतोच. उन्हाळ्यात सरासरी दिवसाकाठी 28 हजार मेगावॅटची मागणी असते. तर पावसाळ्यामध्ये 17 हजार मेगावॅटपर्यंतची मागणी होते. त्यामुळे मागणी घटली असली तरी सध्याच्या वातावरणातील बदलामुळे विजेची मागणी ही वाढत आहे. जूनचा पंधरवाडा ओलांडला की विजेच्या मागणीत घट झाली होती. 14 हजार मेगावॅटवर मागणी आली होती. पण आता पावसाने तर उघडीप दिली आहेच पण ऊन आणि धगाटा वाढत असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असल्याने पुन्हा विद्युत उपकरणे सुरु झाली आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे.

कृषीपंप अन् घरगुती वापरातही वाढ

मध्यंतरी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होऊन देथील आता जिरायत क्षेत्रावरील पिकांना पाणी देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. बागायती क्षेत्रावर ओलावा असला तरी कोरडवाहू क्षेत्रावरील ओल उडून गेली आहे. त्यामुळे कृषीपंप सुरु करुन पिकांना पाणी द्यावे लागत आहे. सर्वच क्षेत्रावर ही स्थिती नसली तरी काही भागात पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे उकाड्यामध्येच विद्युत उपकरणे सुरु झाली आहेत. वातावरणात गारवा तर नाहीच पण उन्हाळ्याप्रमाणे उकडत असल्याने विद्युत उपकरनांचा वापर वाढला आहे.

खासगी वीज प्रकल्पांमधून पुरवठा

वाढत्या विजेच्या वापरामुळे महावितरणवरील ताणही वाढला आहे. त्यामुळे महावितरण हे महानिर्मितीकडून 6 हजार मेगावॅट, खासगी प्रकल्पातून 4 हजार 800 मेगावॅट वीज खरेदी करीत आहे. यातूनच मागणीप्रमाणे विजेचा पुरवठा सुरु आहे. सर्वाधिक विजेचा वापर हा मुंबई शहरात होत आहे.या शहरासाठी टाटा पॉवर, केंद्रीय वीज प्रकल्पातून पुरवठा होत आहे.