Beed : दुष्काळात तेरावा, दर घसरल्याने कांदा वावरातच, पावसामुळे उरली-सुरली आशाही मावळली

| Updated on: May 21, 2022 | 10:40 AM

सध्या उन्हाळी हंगामातील कांद्याची काढणी कामे मोठ्या जोमात सुरु आहेत. असे असले तरी दुसरीकडे दरात घसरण त्याच तुलनेत घसरत आहेत. आतापर्यंत 800 ते 900 रुपये क्विंटल असलेला कांदा आता 100 ते 50 रुपये क्विंटलवर येऊन ठेपला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना 1 रुपया किलो असा दर मिळत आहे.

Beed : दुष्काळात तेरावा, दर घसरल्याने कांदा वावरातच, पावसामुळे उरली-सुरली आशाही मावळली
Follow us on

बीड : कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बाजारपेठेत 1 ते 2 रुपये किलो अशी मागणी असल्याने आता शेतकऱ्यांनी (Onion Crop) कांद्याची काढणीच बंद केली आहे. (Onion Rate) वाढीव दराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना (Pre-Monsoon) मान्सूनपूर्व पावसाने असा काय तडाखा दिला आहे की, कांदा विक्रीबाबतची उरली-सुरली आशाही मावळली आहे. कांदा आता वावरातच सडणार आहे. आष्टी तालुक्यातील कडा, धामनगाव परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. आगोदर कवडीमोल दरामुळे शेतकरी त्रस्त आहेत त्यातच आता पावसामुळे कांदा पीक पाण्यात अशी अवस्था आहे.

कांद्याच्या दरात घसरण सुरुच

सध्या उन्हाळी हंगामातील कांद्याची काढणी कामे मोठ्या जोमात सुरु आहेत. असे असले तरी दुसरीकडे दरात घसरण त्याच तुलनेत घसरत आहेत. आतापर्यंत 800 ते 900 रुपये क्विंटल असलेला कांदा आता 100 ते 50 रुपये क्विंटलवर येऊन ठेपला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना 1 रुपया किलो असा दर मिळत आहे. आवकमध्ये झालेली वाढ आणि घटलेली मागणी यामुळे ही परस्थिती ओढावली आहे. कांदा दराचा लहरीपणा यावेळी शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.

काढणी झालेल्या कांद्याची नासाडी

उन्हाळी हंगामातील कांद्याची काढणी सुरु आहे. मजूरांकरिता दिवसाकाठी 300 रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात शिवाय छाटणीची मजूरी ही वेगळीच. कांदा बाजारपेठेत दाखल करण्यासाठी जेवढा खर्च होतो तेवढे उत्पन्न देखील या कांद्यातून होत नाही ही वस्तूस्थिती आहे. यातच ऐन काढणी सुरु असतानाच आष्टी तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने कांद्याची नासाडी अटळ आहे. त्यामुळे आता या पिकातून उत्पन्न तर सोडाच पण आता कांद्याचे किमान खत तरी होईल या आशेने वावरातच कांदा ठेवला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

अशी झाली कांदा दरात घसरण

उन्हाळी हंगामातील कांदा मार्केटमध्ये दाखल होताच कांद्याच्या दरात घसरण होण्यास सुरवात झाली होती. 32 रुपये किलो असणारा कांदा अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत 1 रुपऐ किलोवर येऊन ठेपला आहे. कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामधून उत्पादन तर सोडाच पण लागवडीचा आणि आता काढणीचा खर्चही निघणे मुश्किल झाले. शिवाय भविष्यात दर आणखीन घसरतीलच असा अंदाज आहे.