AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahaparinirvan Din: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाविषयी मोठी अपडेट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारीखच सांगितली

Mahaparinirvan Diwas: आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाविषयी मोठी घोषणा केली.

Mahaparinirvan Din: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाविषयी मोठी अपडेट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारीखच सांगितली
महापरिनिर्वाण दिवस, इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारकImage Credit source: गुगल
| Updated on: Dec 06, 2025 | 9:51 AM
Share

Dr Babasaheb Ambedkar memorial in Indu Mill Mumbai: आज 6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबडेकर महापरिर्निवाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला. कालपासून अनुयायांची मोठी गर्दी झाली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी महामानवाला अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी महत्त्वाची माहिती दिली. हे स्मारक पुढील 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

अमेरिकेच्या जे लक्षात आले नाही…

बाबासाहेबांच्या कार्यांना उजाळा देताना मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. अमेरिकेच्या न्यूजर्सीचे गव्हर्नर यांनी नुकतीच मुंबईला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी एक माहिती दिली. त्यानुसार, न्यूयॉर्कसह इतर शहरात वीजेची कमतरता भासते. कारण त्यांच्याकडे स्टेट ग्रीड आहे. नॅशनल ग्रीड नाही. त्यावेळी मला हे लक्षात आलं की बाबासाहेब किती द्रष्टे होते. वीज मंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी संपूर्ण भारतात एक राष्ट्रीय ग्रीड तयार करायची असा निर्णय घेतला. भारतातील कुठल्याही भागातून दुसऱ्या कुठल्याही भागात वीज वाहून नेता आली पाहिजे. त्यांच्या या द्रष्टेपणामुळे भारतातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून वीज वाहून आणता येते. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला जे लक्षात आलं नाही. ते भाररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षात घेऊन भारताला स्वयंपूर्ततेकडे नेण्याचा द्रष्टपणा दिसून येतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

इंदू मिलचे स्मारक एका वर्षात

यावेळी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हे पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मुंबईतील दादर येथील इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं जागतिक दर्जाचं भव्य स्मारक उभारलं जात आहे. यामध्ये 450 फूट उंचीचा त्यांचा पुतळा असेल. हे स्मारक डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 ऑक्टोबर 2015 रोजी केलं होतं. स्मारकाचं काम सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.