AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चमकदार चेहरा हवा आहे? केळी, संत्री, बटाट्याच्या सालीचा असा करा वापर

Glowing Face : फळे आणि भाज्यांच्या सालींमध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक पोषक घटक, व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स आढळतात, जे त्वचेला पोषण देतात.

चमकदार चेहरा हवा आहे? केळी, संत्री, बटाट्याच्या सालीचा असा करा वापर
Glowing SkinImage Credit source: Google
| Updated on: Mar 09, 2026 | 6:40 PM
Share

तुमच्यापैकी बरेल लोक फळे आणि भाज्यांचे सेवन केल्यानंतर त्यांची साल कचरापेटीत टाकून देतो. मात्र बटाटा, केळी, संत्री किंवा काकडीची साल तुमच्या चेहऱ्यासाठी खास ठरू शकते. कारण फळे आणि भाज्यांच्या सालींमध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक पोषक घटक, व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स आढळतात, जे त्वचेला पोषण देतात आणि तिचा नैसर्गिक उजाळा वाढवण्यास मदत करतात. सध्या बाजारात लोक महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स मिळतात, मात्र यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला घरी बसून चेहऱ्याची काळजी घ्यायची असेल तर तुमच्यासाठी फळे व भाज्यांची साल खास ठरू शकते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बटाट्याच्या सालीचा वापर

बटाट्याची साल डार्क सर्कल कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. यात फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन C, बी-कॉम्प्लेक्स, आयर्न, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. यामुळे डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे कमी होतात. तसेच यात नैसर्गिक कॅटेकोलेज एन्झाइम असते, जे डोळ्यांखालील काळेपणा कमी करण्यास आणि सूज (पफीनेस) कमी करण्यास मदत करते. यासाठी बटाट्याची साल घ्या आणि डोळ्यांच्या आजूबाजूला हलक्या हाताने रगडा, तुम्हाला काही दिवसांनी फरक जाणवेल.

केळीची साल

बहुतेक लोक केळ्याची साल फेकून देतात. पण ही साल चेहऱ्यावरील डाग आणि मुरूम कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी केळ्याच्या सालीची पांढरी बाजू चेहऱ्यावर सुमारे 20 मिनिटे हलक्या हाताने रगडा. यातील Esterified fatty acids आणि अँटिऑक्सिडंट्स मुरुमांशी लढायला मदत करतात आणि सूर्यप्रकाशामुळे झालेल्या स्किन डॅमेजला नैसर्गिकरीत्या दुरुस्त करण्यास मदत करतात.

संत्र्याच्या सालीचा वापर

संत्रे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते. संत्रे खाल्ल्याने त्वचा चमकदार आणि हायड्रेट राहते. त्याचप्रमाणे त्याच्या सालीचाही त्वचेसाठी वापर करता येतो. संत्र्याची साल वाळवून त्याची पावडर करा. या पावडरमध्ये मध, दही किंवा अ‍ॅलोवेरा जेल मिसळून पेस्ट तयार करा आणि फेस पॅकसारखी वापरा. संत्र्याच्या सालीत असलेले व्हिटॅमिन C कोलेजन वाढवण्यास मदत करते. त्यामुळे डार्क स्पॉट कमी होतात आणि त्वचा स्वच्छ व उजळ दिसते.

पपईची साल

पपईची साल त्वचा चमकदार बनवण्यासाठी उपयुक्त आहे. यात नैसर्गिक पपेन एन्झाइम असतात, जे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतात आणि त्वचेला लगेचच चमक देतात. यासाठी पपईची साल चेहऱ्यावर सुमारे 10 मिनिटे हलक्या हाताने रगडा. काही दिवसांत फरक दिसू लागेल.

टरबूजाच्या सालीचा वापर

उन्हाळ्यात टरबूज जास्त प्रमाणात खाल्ले जाते. यामुळे शरीर थंड आणि हायड्रेट राहते. त्याची सालही त्वचेसाठी उपयुक्त असते. टरबूजाच्या सालीची आतील बाजू चेहऱ्यावर हलक्या हाताने रगडल्यास लालसरपणा कमी होतो आणि त्वचा हायड्रेट राहते. कारण यात नैसर्गिक Citrulline नावाचे अमिनो अ‍ॅसिड असते, जे त्वचेसाठी फायदेशीर असते.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा