AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Teachers Suspended: बीड जिल्हा परिषदेतील 14 शिक्षक निलंबित, शिक्षण विभागात मोठी खळबळ, UDID कार्डचे काय प्रकरण?

Beed ZP UDID Card: बीड जिल्हा परिषदेने शिक्षकांना मोठा दणका दिला. काल शिक्षकांनी संपाचा इशारा दिला. शिक्षक संपाच्या तयारीत असतानाच ही मोठी कारवाई झाली. त्यामुळे शिक्षक वर्गात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे हे UDID कार्डचे प्रकरण?

Beed Teachers Suspended: बीड जिल्हा परिषदेतील 14 शिक्षक निलंबित, शिक्षण विभागात मोठी खळबळ, UDID कार्डचे काय प्रकरण?
बीड जिल्हा परिषद शिक्षक
| Updated on: Dec 06, 2025 | 8:44 AM
Share

Beed Teachers Suspended: बीड जिल्हा शिक्षण विभागात काल झालेल्या कारवाईची चर्चा सुरू आहे. शिक्षण विभागाने 14 शिक्षकांना निलंबित केले आहे. त्याने एकच खळबळ उडाली आहे. UDID कार्ड सादर करण्याच्या आदेशानंतरही काही शिक्षकांनी आपली प्रमाणपत्रे सादर केली नाहीत. वेळ देऊनही आदेशाची अंमलबजावणी न केल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने धडक कारवाई केली. 14 शिक्षकांना निलंबित करण्यात आले. हा आदेश धडकताच एकच धावाधाव सुरू झाली. काल शिक्षकांचा संप सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने अनेक जण धास्तावले. तर काहींनी ही कारवाई कशामुळे झाली हे सांगताच अनेकांचा जीव भांड्यात पडला.

UDID कार्डची मागणी का?

शिक्षण विभागाने UDID कार्ड पडताळणी मोहिम राबवली. त्यात प्रमाणपत्रांची वैधता तपासण्यात आली. त्यासाठी UDID कार्ड सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. अनेकदा शिक्षकांना स्मरण करुन देण्यात आले. नोटीस बजावण्यात आली. तरीही या 14 शिक्षकांनी आदेशाची अंमलबजावणी केली नाही. नोटीस देऊनही ते अनुपस्थित राहिले. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी या कार्यवाहीविषयी माहिती दिली, त्यानुसार, शिस्तभंगाची कारवाई अनिवार्य आहे. प्रमाणपत्रे न सादर करणाऱ्या संबंधित सर्व शिक्षकांवर विभागीय चौकशी सुरू केली जाणार असून, पुढील आदेश येईपर्यंत ते निलंबित राहतील.

UDID Card बोगस?

प्रशासनाने ही प्रमाणपत्र बोगस नसल्याचे स्पष्ट केले. तर जी प्रमाणपत्रं जुनी आहेत. ती ऑनलाईन हवी आहेत. UDID कार्ड काढण्यासाठी शिक्षकांना 23 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर वेळोवेळी ही मुदत वाढवण्यात आली. विहित मुदतीत युडीआयडी कार्ड सादर न केल्याने या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. हे निलंबित शिक्षक अपंग असतील, पण त्यांनी विहित मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना हा दणका देण्यात आला आहे.

बोगस दिव्यांगांची पडताळणी

सध्या बीड जिल्ह्यात बोगस अपंग प्रमाणपत्राआधारे नोकरी लाटली असेल तर त्यांची पडताळणी मोहिम सुरू आहे. त्यातंर्गत 400 लोकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. त्यासाठी UDID कार्डची मागणी करण्यात येत आहे. जर कोणी असं बोगस प्रमाणपत्र सादर केलं असेल तर 2016 मधील दिव्यांग कायद्यानुसार, त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

निलंबित शिक्षकांची यादी 

संपत्ती जाधव रवींद्र धोंडीबा, स.शि., जि.प.प्रा.शा. हातगाव, ता. केज

उषा विठ्ठल माने , स.शि., जि.प.शाळा चौसाळा, बीड

संपत्ती भोसले, रामचंद्र छत्रगुण, स.शि., जि.प.शाळा चौसाळा, बीड

कल्पना गेणू चोपडे, स.शि., जि.प.प्रा.शा. डोईठाण, ता. आष्टी

हेमंत कारभारी शिनगारे, स.शि., जि.प.प्रा.शा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई

संजीवनी विक्रम कंटाळे, स.शि., झेडपी प्रा.शाळा रायमोहा, शिरुर

सय्यद नवाज मौलासाहेब, स.शि., G.P.P.S.S. राधाकृष्ण नगर सिरसाळा, परळी

अंजली मारोतीराव मुंडे, स.शि., G.P.P.S.S. गवळीवस्ती, बीड

शैला साहेबराव देवगुडे, स.शि., G.P.P.S.S. गांधीनगर मराठी, बीड

मनोज नरसिंगराव सुर्यवंशी, स.शि., जि.प.प्रा.शा. जोडवाडी (उजनी केंद्र), अंबाजोगाई

आश्रुबा विश्वनाथ भोसले, स.शि., जि.प.के.प्रा.शा. येळंबघाट, बीड

सिद्धू आसाराम वाटमांड, स.शि., जि.प.प्रा.शा. भोपालेवस्ती, पाटोदा

प्रकाश बलभीम भोसले, स.शि., जि.प.प्रा.शा. पिठी, पाटोदा

सुनंदा धोडोबा बहिर, स.शि., जि.प.के.प्रा.शा. कुसळंब, पाटोदा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.