PM Kisan | याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6,000, यादीत आहे का तुमचे नाव

| Updated on: Feb 03, 2024 | 11:36 AM

PM Kisan Yojana | या योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात 6,000 रुपये जमा करण्यात येतात. पण या रक्कमेचा वापर शेतकरी नेमका कशासाठी करतोय हे काही समोर येत नाही. त्यासाठी आता केंद्र सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांची नावे किसान क्रेडिट कार्डशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी ईकेवायसी करणे आवश्यक आहे.

PM Kisan | याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6,000, यादीत आहे का तुमचे नाव
Follow us on

नवी दिल्ली | 3 February 2024 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासासाठी कृषी समन्वयक आणि सेवा केंद्रावर तुम्हाला माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही जोडणी करण्यावर भर देण्यात येत आहे. लवकरात लवकर दोन्ही योजना लिंक करणे आवश्यक आहे. जर ही जोडणी झाली नाही. केवायसी अपडेट झाले नाही तर वर्षाला मिळणाऱ्या 6,000 रुपयांचा सन्मान निधीवर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागेल. यासंबंधीचे नियम कडक आहे. अनेक शेतकरी यापूर्वी पण केवायसी अपडेटन न केल्याने यादी बाहेर गेले आहेत.

कर्जाचा मिळेल फायदा

किसान क्रेडिट योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची सवलत मिळते. माफक दरात कर्ज घेता येते. अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे. पण पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील सर्वच शेतकरी या योजनेत नाही. आता सरकारने सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना त्यासाठी अर्ज करुन दोन्ही योजनांची लिकिंग करणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

कधी जमा होणार 16 वा हप्ता

पीएम किसान योजनेतंर्गत 15 हप्ता जमा करण्यात आला आहे. आता या योजनेचा 16 हप्ता लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या योजनेतंर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान ही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

DBT माध्यमातून थेट लाभ

गेल्यावर्षी या योजनेचा ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. या 27 जुलै रोजी 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्यांचे अंतर आहे. आता 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये जमा केले. DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली.