कोबीला एक रुपया किलो भावही नाही, हताश शेतकऱ्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला

| Updated on: Dec 15, 2020 | 1:22 PM

समरस्तीपुरच्या शेतकऱ्याने पत्ता कोबीच्या पिकाला रास्त भाव न मिळाल्याने हताश होवून हातात आलेल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला.

कोबीला एक रुपया किलो भावही नाही, हताश शेतकऱ्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला
Follow us on

पाटणा : देशात सध्या ननीव शेतकरी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे (Farmer Drove A Tractor On Cauliflower Crop). यादरम्यान बिहारच्या समस्तीपूर येथून एक निराशाजनक बातमी पुढे आली आहे. येथील शेतकऱ्याने पत्ता कोबीच्या पिकाला रास्त भाव न मिळाल्याने हताश होवून हातात आलेल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला. ही बातमी हवेसारखी पसरली आणि शेतकरी किती हतबल झाला आहे याची चर्चा सर्वत्र होवू लागली. समस्तीपूर जिल्ह्यातील मुक्तापूरचे शेतकरी ओम प्रकाश यादव यांच्यामते कोबीच्या शेतीत फायदा नाही तर नुकसान होत आहे (Farmer Drove A Tractor On Cauliflower Crop).

पहिले कोबीच्या पिकाला मजुरांकडून कापून घ्यावं लागतं, त्यानंतर पोत्यात त्यांना भरावं लागतं. त्यानंतर ठेल्यावरुन नेवून ही कोबी बाजारात पोहोचवावी लागते. पण, बाजारात या कोबीला एक रुपया प्रतीकिलो भावातही कोणी विकत घ्यायला तयार नाही. त्यामुळे नाईलाजाने आपल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला, अशी माहिती ओम प्रकाश यादव यांनी दिली. त्यांच्यामते, कोबीच्या शेतीसाठी चार हजार रुपये प्रती कट्टा येत आहे. पण बाजारात त्याला बाजारात एक रुपये किलोही भाव मिळत नाही.

त्यामुळे नाराज आणि हताश झालेल्या शेतकऱ्याने आपल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला. पीडित शेतकऱ्याने सांगितलं की, असं दुसऱ्यांदा झालं आहे की त्याचं पिक वाया गेलं आहे. यापूर्वीही त्याच्या पिकाला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. त्यामुळे आता ते त्यांच्या शेतात ते गहूची लागवड करणार आहेत. सरकारकडून त्यांना एका रुपयाचीही मदत मिळालेली नाही. यामुळे त्यांचा गहूही खराब झाला. त्यानंतर सरकारकडून त्यांना फक्त 90 हजारांची मदत मिळाली.

ओम प्रकाश यादव यांना कोबीच्या शेतात ट्रॅक्टर चालवताना बघून आजुबाजूचे लोक धावत आले आणि कोबी उचलून घेवून गेले. पिकाला किंमत न मिळाल्याने हा शेतकरी लोकांना त्याचं पीक लुटून नेताना बघूनही संतुष्ट आहे.

Farmer Drove A Tractor On Cauliflower Crop

संबंधित बातम्या :

हिंगोलीच्या शेतकऱ्याची कमाल; दुष्काळी पट्ट्यात पपईचे विक्रमी उत्पादन, कमावला लाखोंचा नफा

नांदेडच्या शेतकऱ्याला गावरान कारल्यातून फायदा, हळद पिकावरील कीड रोखण्यासाठी आयडियाची भन्नाट कल्पना

कृषी कायदे जुलमी स्वरुपाचे, मोदी सरकारनं ते तातडीनं रद्द करावेत, अब्दुल सत्तारांची मागणी