हिंगोलीच्या शेतकऱ्याची कमाल; दुष्काळी पट्ट्यात पपईचे विक्रमी उत्पादन, कमावला लाखोंचा नफा

दुष्काळी पट्टा असल्याने शेतीतून भक्कम उत्पादन काढणं तसे जिकिरीचं होते. | Hingoli farmer

हिंगोलीच्या शेतकऱ्याची कमाल; दुष्काळी पट्ट्यात पपईचे विक्रमी उत्पादन, कमावला लाखोंचा नफा
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 2:56 PM

हिंगोली: एखादी गोष्ट मनावर घेतली तर काहीही अशक्य नाहीये याचीच प्रचिती हिंगोलीच्या सेनगावात राहणाऱ्या संतोष नागरे यांच्याकडे पाहून येते. हिंगोली हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, या दुष्काळी भागात संतोष नागरे यांनी आपल्या प्रयोगशीलतेने पपईचे भरघोस उत्पादन घेऊन दाखवले आहे. या माध्यमातून नागरे यांनी लाखोंची कमाई केली आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना संतोष नागरे यांनी आपल्या प्रयोगशीलतेने विक्रमी उत्पादन घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Hingoli farmer taking record brek Papaya production)

दुष्काळी पट्टा असल्याने शेतीतून भक्कम उत्पादन काढणं तसे जिकिरीचं होते. पण नागरे यांनी शेतात पाण्याची सोय केली. त्यावर तैवान 786 जातीच्या एक हजार पपईच्या झाडांची लागवड केली. त्यानंतर पपईला बहरही आला पण परतीचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे यातील झाडांचे प्रचंड नुकसान झाले.

मात्र, संतोष नागरे यांनी नाउमेद न होता पुन्हा एकदा बाग उभारली. यानंतर पपईचे पीक तुलनेत कमी आले पण नागरे यांनी दुचाकीवरून स्वत: ग्राहकांपर्यंत पोहोचत पपईची विक्री केली. त्यामुळे संतोष नागरे यांच्या खिशात थेट नफा पडला.

नागरे यांना पपई लागवडीसाठी 93 हजार रुपयांचा खर्च आला होता. आतापर्यंत पपई विक्रीतून त्यांना दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आगामी काळात या बागेतून आणखी दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा संतोष नागरे यांचा अंदाज आहे. निसर्गाच्या संकटात ही हिंमत न हरता पिकांचं योग्य नियोजन करून त्याच संगोपन केल्याने नागरे यांच्या दारी भरभराट आली.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात फक्त महाबळेश्वरच नाही, या जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पादन होतं

महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीची पुण्याच्या गावडेवाडीत लागवड, युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

शरद पवारांनाही भावलेलं डाळिंब उत्पादनातील अग्रेसर गाव!, खानजोडवाडीतील शेतकऱ्यांची यशोगाथा

(Hingoli farmer taking record brek Papaya production)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.