AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीची पुण्याच्या गावडेवाडीत लागवड, युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

पुणे जिल्ह्यातील अक्षय टेमकर या युवकानं आंबेगाव तालुक्यात स्ट्रॉबेरी पीक घेतलं आहे. (Akshay Temkar Strawberry Pune)

महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीची पुण्याच्या गावडेवाडीत लागवड, युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
| Updated on: Dec 02, 2020 | 3:02 PM
Share

पुणे : स्ट्रॉबेरी म्हणलं की आपल्याला महाराष्ट्राचं मिनी काश्मीर महाबळेश्वरची आठवण होते. मात्र, स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वरला जाण्याची गरज पडणार नाही. कारण पुणे जिल्ह्यातील अक्षय टेमकर या युवकानं आंबेगाव तालुक्यात स्ट्रॉबेरी पीक घेतलं आहे. गावडेवाडी येथील अक्षय बाबाजी टेमकर या कृषी पदवीधारक युवकाने काळया मातीत स्ट्रॉबेरी पीक घेऊन आंबेगाव तालुक्यातील शेतकर्‍यांपुढे एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.  (Akshay Temkar Strawberry farming Pune)

आदर्शगाव गावडेवाडी माजी उपसरपंच बाबाजी टेमकर हे नेहमीच आपल्या शेतीत विविध प्रयोग करत असतात. त्यांचा मुलगा अक्षयनं कृषी विषयाची पदवी संपादन केली. इतरांप्रमाणं नोकरीच्या मागे न लागता स्वत:च्या शेतातच काम करून नवनवीन पिके घेण्याकडे लक्ष देऊ लागला आहे. अक्षय स्वत:च्या शिक्षणाचा वापर करुन वडिलांना शेतात मदत करू लागला आहे.

साताऱ्याहून स्ट्रॉबेरीची रोपं मागवली

अक्षय टेमकर त्यांच्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतो. अक्षयनं साताऱ्याहून स्ट्रॉबेरीची रोपं आणून लागवड केली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात स्ट्रॉबेरीला प्रतिकूल हवामान नसतानादेखील त्यांनी 11 गुंठे क्षेत्रात 6100 स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. स्ट्रॉबेरीच्या झाडांची निगा राखल्यानं आज त्यांना उत्पादन चालू झाले आहे. रोपं आणि औषधं यासाठी त्यांना आत्तापर्यंत 60 ते 70 हजार रुपये खर्च आलाय. हिवाळ्यातील थंडीच्या कालावधीचा अभ्यास करुन योग्य लागवड केल्यास आंबेगाव परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड करता येऊ शकते, असं अक्षय टेमकर यांनी सांगितले. (Akshay Temkar Strawberry Pune)

सोशल मीडियाचा प्रभावी वापर

अक्षय टेमकर याने वडील बाबाजी टेमकर व आई सविता टेमकर यांच्या मदतीने यशस्वीपणे स्ट्रॉबेरीची लागवड केली. स्ट्रॉबेरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा मार्ग अक्षयनं निवडला. इंस्टाग्रामच्या सहाय्यानं @shetkariraja या नावाने अकाऊंट तयार करुन आत्तापर्यंत त्याने घेतलेल्या पिकाची माहिती व छायाचित्रे अपलोड केली.ऑक्टोबर महिन्यात लागवड केल्यानंतर आता दिवसाआड स्ट्रॉबेरीचा तोडा चालू झाला आहे.

स्ट्रॉबेरीचे तोडे दिवसाआड सुरु झाले असून आता स्थानिक बाजारपेठ व मॉल मधून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे, असल्याची माहिती अक्षय टेमकर यांनी दिली. यावर्षी महाबळेश्वर परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड अतिवृष्टीमुळे कमी झाल्यामुळे अक्षयने लावलेल्या स्ट्रॉबेरीला अडीचशे ते साडेतीनशे रुपये बाजार भाव मिळत आहे.

नुकतेच चालू झालेल्या स्ट्रॉबेरी पिकाचे अजून तीन ते चार महिने उत्पादन सुरू राहणार आहे. तीन ते चार महिन्यात तीन ते साडेतीन टन उत्पादन घेऊन उत्पादन खर्च वजा जाता दोन ते अडीच लाख रुपये मिळतील,असा विश्वास अक्षय टेमकर याने व्यक्त केला आहे. (Akshay Temkar Strawberry Pune)

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात फक्त महाबळेश्वरच नाही, या जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पादन होतं!

एका दाण्याचे शंभर दाणे करण्याची ताकद फक्त शेतीत, मंत्री एकनाथ शिंदे स्ट्रॉबेरीच्या शेतात

(Amit Temkar Strawberry Pune)

शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.
सभागृहातही धुरंधरचा फिव्हर... एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
सभागृहातही धुरंधरचा फिव्हर... एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा.
१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.