एका दाण्याचे शंभर दाणे करण्याची ताकद फक्त शेतीत, मंत्री एकनाथ शिंदे स्ट्रॉबेरीच्या शेतात

एकनाथ शिंदे आणि खासदार मुलगा श्रीकांत शिंदे हे मूळगावी शेती करताना दिसले.

  • रमेश शर्मा, टीव्ही 9 मराठी
  • Published On - 13:04 PM, 27 Nov 2020

सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्यांनी मिळवलेल्या पदवीमुळे नुकतेच चर्चेत होते. आता एकनाथ शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एकनाथ शिंदे हे शेतात राबताना दिसले. मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार मुलगा श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे आपल्या मूळगावी जाऊन शेतात काम करताना पाहायला मिळाले. शिंदे कुटुंबाचं महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे मूळगाव. (Minister Eknath Shinde Strawberry Farming at dare village Mahabaleshwar)

नुकतंच रविवारी (22 नोव्हेंबर) एकनाथ शिंदे दरे गावात गेले होते. एक-दोन दिवस गावात घालवल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत बुधवारी थेट शेत गाठलं. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि चुलत भाऊ महेश शिंदेही होते. शिंदे कुटुंबाने स्ट्रॉबेरीच्या शेतात जाऊन लागवड केली. महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र असलेल्या एकनाथ शिंदेंना गावातील तरुणांना शेती करा असा संदेश अप्रत्यक्षरित्या दिला.

शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पण हल्ली गावाकडील लोक शेती व्यवसायाकडे पाठ करुन, नोकरीत जास्त लक्ष देत आहेत. शेती हा एका दाण्याचे शंभर दाणे करणारा व्यवसाय आहे. त्यामुळे गावातील तरुण वर्गाला शेती करा असा संदेश यावेळी एकनाथ शिंदेंनी दिला.

एकनाथ शिंदे ग्रॅज्युएट

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. (shivsena leader eknath shinde passed BA final year exam from ycmou)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. शिंदे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत 77.25 टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे.

(Minister Eknath Shinde Strawberry Farming at dare village Mahabaleshwar)

संबंधित बातम्या 

एकनाथ शिंदे अखेर ग्रॅज्युएट; पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण  

वडिलांचे गुण पाहून मुलगा भारावला, बिकट परिस्थिमुळे शिक्षण सुटलेल्या वडिलांबाबत श्रीकांत शिंदे म्हणतात….