वडिलांचे गुण पाहून मुलगा भारावला, बिकट परिस्थिमुळे शिक्षण सुटलेल्या वडिलांबाबत श्रीकांत शिंदे म्हणतात….

बिकट आर्थिक परिस्थितीमुळे साहेबांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले पण शिक्षणाची जिद्द मात्र त्यांनी सोडली नव्हती, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

वडिलांचे गुण पाहून मुलगा भारावला, बिकट परिस्थिमुळे शिक्षण सुटलेल्या वडिलांबाबत श्रीकांत शिंदे म्हणतात....
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 1:24 PM

मुंबई :  राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. वडिलांच्या पदवी परीक्षेच्या निकालानंतर सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी भावूक ट्विट केलं आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे साहेबांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले पण शिक्षणाची जिद्द मात्र त्यांनी सोडली नव्हती, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. (MP Shrikant Shinde tweet After Eknath Shinde Graduate)

लहान वयातच घराची जबाबदारी खांद्यावर आल्याने एकनाथ शिंदे साहेब यांना एका मत्स्य वाहतूक व्यवसाय कंपनीत वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी नोकरीला सुरुवात करावी लागली. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिंदे साहेबांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले पण शिक्षणाची जिद्द मात्र त्यांनी सोडली नव्हती, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे किंवा प्रयत्नांती परमेश्वर’, या म्हणींचा प्रत्यय मला घरातच एकनाथ शिंदे यांच्या अथक व अविश्रांत मेहनतीच्या रूपातून पाहायला मिळतो. अखंड,अविश्रांत मेहनतीची तयारी व जिद्द असेल तर आयुष्यात यशस्वी होता हे शिंदे साहेबांच्या आजच्या निकालातुन सिद्ध होतं, अशा भावना श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केल्या.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत 77.25 टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे.

श्रीकांत शिंदे ट्विटमध्ये म्हणतात,

“लहान वयातच घराची जबाबदारी खांद्यावर आल्याने एकनाथ शिंदे साहेब यांना एका मत्स्य वाहतूक व्यवसाय कंपनीत वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी नोकरीला सुरुवात करावी लागली. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिंदे साहेबांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले पण शिक्षणाची जिद्द मात्र त्यांनी सोडली नव्हती. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कला शाखेत 77.25 टक्के गुण मिळवून पदवी संपादन केली.”

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन मंगळावीर पार पडला. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिंदे शिवाजी पार्क येथे आले असता त्यांनीच परीक्षा पास झाल्याची माहिती दिली. सगळ्यांनाच आपल्या मनासारखं शिक्षण घेता येत नाही. श्रीकांत डॉक्टर झाले. पण माझं शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं. मनात शिक्षणाची जिद्द होती. तळमळ होती. शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे पदवीधर व्हायचंच अशी मनाशी खुणगाठ बांधली आणि जसा जसा वेळ मिळाला तशा परीक्षा दिल्या आणि आज बीए पास झालो, असं शिंदे म्हणाले.

(MP Shrikant Shinde tweet After Eknath Shinde Graduate)

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदे अखेर ग्रॅज्युएट; पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण

‘कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी जाहीर करावी’, एकनाथ शिंदेंचं आवाहन

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.