महाराष्ट्रात फक्त महाबळेश्वरच नाही, या जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पादन होतं!

नंदुरबार : स्ट्रॉबेरीचं नाव घेतलं की आपल्याला क्षणात महाबळेश्वरची आठवण होते. येथे मिळणाऱ्या रसाळ आणि अवीट चवीच्या स्ट्रॉबेरीचा स्वाद अनेकांनी अनुभवला असेल. मात्र महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला टक्कर देण्यासाठी सातपुड्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. या भागात काही शेतकरी स्ट्रॉबेरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. विशेष म्हणजे गाजावाजा न करता त्यांचा हा प्रयोगशील उपक्रम त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळवून […]

महाराष्ट्रात फक्त महाबळेश्वरच नाही, या जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पादन होतं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नंदुरबार : स्ट्रॉबेरीचं नाव घेतलं की आपल्याला क्षणात महाबळेश्वरची आठवण होते. येथे मिळणाऱ्या रसाळ आणि अवीट चवीच्या स्ट्रॉबेरीचा स्वाद अनेकांनी अनुभवला असेल. मात्र महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला टक्कर देण्यासाठी सातपुड्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. या भागात काही शेतकरी स्ट्रॉबेरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. विशेष म्हणजे गाजावाजा न करता त्यांचा हा प्रयोगशील उपक्रम त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळवून देत आहे. त्यामुळे सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना नवीन पर्याय उपलब्ध झाला.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये वसलेलं तोरणमाळ हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण. तोरणमाळ हे छोटंसं गाव, अनेक पाडे मिळून या गावाने आकार घेतला आहे. या भागात तापमान बऱ्यापैकी कमी असतं. सातपुड्याच्या उंचावर हा भाग असल्याने येथे नेहमी थंड वातावरण राहतं. याच वातावरणाचा फायदा घेत येथील शेतकरी स्ट्रॉबेरी लागवड करतात.

विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हे शेतकरी यशस्वी स्ट्रॉबेरी लागवड करून लाखोंचा नफा कमावत आहेत. त्यातीलच एक सुशांत चव्हाण यांनी अडीच एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी महाबळेश्वर येथे जाऊन स्वतः रोपे तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि आपल्या तोरणमाळ अति दुर्गम भागातील गावात येऊन अडीच एकरात रोपे तयार करून लागवड केली. अवघा 15 हजार खर्च केला असून त्यांना स्ट्रॉबेरी लागवडीतून कमीत कमी तीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. पारंपरिक पद्धतीनेच स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेत असल्याने आणि मजूर सर्व स्ततःच्याच घरातले असल्याने वसावे यांची स्ट्रॉबेरीची शेती जगण्याचा आधार बनली आहे.

चव्हाण यांना स्ट्रॉबेरी विकण्यासाठी कोणतीही बाजारपेठ शोधण्याची गरज नाही. तोरणमाळ येथे पर्यटनासाठी येणारे पर्यटक त्यांची स्ट्रॉबेरी खरेदी करतात. त्याचसोबत त्यांनी पाण्याचे नियोजन केले असून ते ठिबक सिंचनाद्वारे स्ट्रॉबेरीच्या पिकाला पाणी देऊन सर्व कामाचे नियोजन करतात. दररोज त्यांच्या या शेतातून 15 ते 20 किलो स्ट्रॉबेरीचे उत्पन्न येण्यास सुरुवात झाली असून येत्या काळात हे उत्पन्न वाढणार आहे.

सातपुड्याच्या खोऱ्यात उत्पादित या स्ट्रोबेरीची चव ही लाजवाब अशी आहे. सातपुड्याच्या या स्ट्रॉबेरीची रसाळता इतकी प्रचलित झाली आहे की या भागात येणारा प्रत्यकेजण स्ट्रॉबेरी घेतल्याशिवाय या भागातून पुढे जात नाही. या शेतकऱ्यांनाही स्ट्रॉबेरी विकायला कुठेही मोठ्या बाजारपेठेत जायची गरज भासत नाही. बहुतांश माल आधीच 200 रुपये किलो दराने बूक असतो. तर उरलेला माल शेजारच्या बाजारपेठेत विकला जातो.

सातपुड्यातील तोरणमाळ आणि डाब येथील कसदार आणि रसाळ स्ट्रॉबेरीचा डंका आता हळूहळू सर्वत्र जाणवू लागला आहे. रडत कुढत न बसता हवामान, उपलब्ध साधनाच्या जोरावर आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी लागवड सातपुड्यात यशस्वी करून दाखवली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.