कोरोना काळात नोकरीची अनिश्चितता, इंजिनिअर, एमबीए तरुणांनी कुक्कुटपालनाची धरली वाट

करिअरमधील असुरक्षिततेमुळे औरंगाबादमधील अभियंते आणि व्यवस्थापन पदवीधर आता कुक्कुटपालन आणि शेळी पालन यासारखे पर्याय स्वीकारत आहेत.

कोरोना काळात नोकरीची अनिश्चितता, इंजिनिअर, एमबीए तरुणांनी कुक्कुटपालनाची धरली वाट
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगार होण्याची भीती आणि करिअरमधील असुरक्षिततेमुळे औरंगाबादमधील अभियंते आणि व्यवस्थापन पदवीधर आता कुक्कुटपालन आणि शेळी पालन यासारखे पर्याय स्वीकारत आहेत. औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात (केव्हीके) कुक्कुटपालन व बकरी पालन अभ्यासक्रमातील तज्ज्ञ डॉ. अनिता जिंतूरकर यांनी पीटीआयला सांगितले की, जीवनात व्यावसायिक स्थिरता असावी यासाठी 20 अभियंते व व्यवस्थापन पदवीधारकांनी अलीकडेच कुक्कुटपालन पालन अभ्यासक्रमाला नोंदणी केली आहे.

कुक्कुटपालन अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या अभियंत्यांना असे वाटते की ते ठराविक पगार मिळवण्यासाठी दरमहा बरेच तास काम करत असत. कोविड 19 मुळे नोकरीच्या अनिश्चिततेमुळे यापैकी काही अभियंता आणि व्यवस्थापन पदवीधरांनी कुक्कुटपालनाला नोंदणी केली. कुक्कुटपालन करताना ठराविक वेळ काम करून अधिक नफा मिळवता येईल असा विश्वास असल्याने कुक्कुटपालन व शेळी पालन करण्याचा निर्णय घेतला आहे असल्याचं पदवीधरांनी सांगितलं आहे.

शेळीपालनाकडे कल

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ (परभणी) अंतर्गत चालवल्या जाणार्‍या केव्हीकेमध्ये कृषीपूरक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. डॉ. जिंतूरकर म्हणाल्या की, त्यांच्याकडे आतापर्यंत कुक्कुटपालन व बकरी पालन अभ्यासक्रमासाठी 20 अर्ज प्राप्त झाले असून लवकरच अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू केला जाईल.

“या विद्यार्थ्यांमध्ये 15 अभियंते, दोन व्यवस्थापन पदवीधारक आणि तीन पदविकाधारक आहेत. पूर्वी पूर्णवेळ शेती करणारे असे प्रकारचे प्रशिक्षण घेत असत, पण कोविड 19 मुळे लॉकडाऊन झाल्यानंतर अभियंता व व्यवस्थापन पदवी धारकांनाही कुक्कुटपालन व शेळीपालन करावेसे वाटत आहे.

कंपनीने राजीनामा मागितला….

सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असलेले पवन पवार म्हणाले की, त्यांच्या कुटुंबाकडे शेतीसाठी जमीन आहे, परंतु सध्या तेथे शेती करण्यास कोणी नाही. ते म्हणाले, ‘महिन्याच्या शेवटी निश्चित उत्पन्न मिळविण्यासाठी मी दररोज बरेच तास काम करतो. मला वाटतं की जर मी माझा वेळ आणि शक्ती कुक्कुटपालन आणि शेळी पालन व्यवसायात गुंतवलो तर मी अधिक पैसे कमवू शकेन, म्हणून मी या कोर्ससाठी अर्ज केला आहे.’

गेवराई तांडा गावात राहणारे अभियंता कृष्णा राठोड म्हणाले, ‘लॉकडाऊनच्या वेळी माझ्या कंपनीने मला राजीनामा देण्यास सांगितले. यामुळे मला भीती वाटली कारण मला असे समजले की या क्षणी नोकरीमध्ये काही निश्चितता नाही. म्हणून, मी बकरी पालन आणि कुक्कुटपालनाबद्दल शिकण्याचा निर्णय घेतला. सध्या माझ्याकडे एक नोकरी आहे, परंतु माझा व्यवसाय सुरू झाल्यावर मी ही नोकरी सोडणार आहे., असं कृष्णा राठोड म्हणाले.

इतर बातम्या:

Monsoon Alert : राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, IMD कडून रेड, ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी

Maharashtra Rain Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट, राज्यात आजही मुसळधार

corona and lockdown impact on job security so engineers and mba degree holders will start poultry farming Maharashtra

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI