कापूस उत्पादकांना अच्छे दिन, भविष्यही उज्वल मात्र घ्यावी लागणार ‘ही’ काळजी

| Updated on: Nov 04, 2021 | 2:55 PM

खरीपातील सोयाबीनचे पावसामुळे नुकसान झाले असले तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण यंदा कापसाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. शिवाय यामध्ये अशीच वाढ होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. ज्याप्रमाणे यंदा मराठवाड्यात कापसाचे उत्पादन घटलेले आहे त्याचप्रमाणे देशातही झाले आहे.

कापूस उत्पादकांना अच्छे दिन, भविष्यही उज्वल मात्र घ्यावी लागणार ही काळजी
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : खरीपातील सोयाबीनचे पावसामुळे नुकसान झाले असले तरी (Cotton prices) कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण यंदा कापसाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. शिवाय यामध्ये अशीच वाढ होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. ज्याप्रमाणे यंदा मराठवाड्यात कापसाचे उत्पादन घटलेले (decline in production) आहे त्याचप्रमाणे देशातही झाले आहे. तर दुसरीकडे कापसाचा वापर आणि कमीसाठा यामुळे कापसाला भविष्यातही चढेच दर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे खानदेशातील कापूस उत्पादकांच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे चित्र आहे.

खानदेशाच गेल्या काही दिवसांपासून गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यातील व्यापारी कापूस खरेदीसाठी दाखल होत आहेत. त्यामुळे कापसाचा दर हा 8250 पर्यंत पोहचला असून भविष्यातही दर वाढणारच असल्याचे सांगितले जात आहे. कापसाचा वापर हा वाढणार असल्याने जागतिक स्तरावरही मागणी वाढणार आहे. त्यामुळे पांढऱ्या सोन्याच्या बाबतीत सर्वकाही पोषक असल्याने सोयाबीनमध्ये झालेले नुकसान यंदा कापसातून भरुन निघणार आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा ना तोटा

सरासरीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे तर कापसाचे क्षेत्र हे कमी झाले आहे. असे असताना पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता कापसाला दर चांगला असला तरी प्रत्येक शेतकऱ्याने कापसाची लागवड केली असे नाही. त्यामुळे कापसाचे दर वाढले तरी याचा फायदा खानदेशातील शेतकऱ्यांनाच अधिकचा होणार आहे. सध्या कापूस वेचणीची कामे सुरु आहेत. पण खताचा डोस देऊन कापसाचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करीत आहेत.

यामुळे पांढऱ्या सोन्याचे दरात होणार वाढ

एकतर यंदा कापसाचे क्षेत्र हे घटलेले आहे. केवळ राज्यातच नाही तर देशात हीच अवस्था आहे. त्यामुळे उत्पादन कमी म्हणल्यावर मागणी अधिक राहणार आहे. हाच अंदाज जागतिक पातळीवर वर्तवण्यात येत आहे. शिवाय कोरोनाच्या काळात कापसाला चांगली मागणी राहिलेली होती. त्यामुळे यंदा कापसाचा साठाच शिल्लक नाही. कमी पुरवठा आणि वाढलेल्या वापरामुळे गेल्या हंगामातील कापसाची मोठ्या प्रमाणात विक्री झालेली आहे. त्यामुले यंदाच्या हंगामात शिल्लक साठा कमी असल्याने दर हे चढेच राहणार आहेत.

देशातून निर्यातही होणार कमी

देशात उत्पादनच कमी असल्याने यंदा कापसाची निर्यात होणार नसल्याचे चित्र आहे. कारण येथील प्रक्रिया उद्योगाला पुरेल एवढेच देशात झाल्यावर निर्यातीचा विषयच राहणार नाही. सध्या कापूस उत्पादक देशांमध्येच आंतरराष्ट्रीय कापूस दरापेक्षा अधिकचा दर आहे त्यामुळे महत्वाच्या देशातून कापसाची निर्यातच होणार नाही. त्याच देशात कापसाला चांगले दर मिळणार आहेत.

कापूस वेचणी करताना घ्या काळजी

केवळ योग्य प्रकारे कापसाची वेचनी न केल्याने उत्पादनात घट होते. वेचणीच्या दरम्यान, इतर काडी, पालापोचोळा येणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण त्यावरुनच कापसाची प्रत ठरणार आहे. त्यामुळे वर्षभर केलेल्या मेहनतीचे चीज करायचे असेल तर वेचणीही तेवढीच महत्वाची आहे. कापसाच्या वेचणीनंतर तो कोरड्या खोलीत साठवून ठेवावा. उघड्या अंगणात साठविलेल्या असल्यास त्वरित झाकून ठेवावा. डागाळलेला रंग बदललेल्या किडलेल्या बोंडापासून चांगला कापूस वेगळा साठवावा.

संबंधित बातम्या :

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तर सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा

दसऱ्यात तारले दिवाळीत मात्र, झेंडूच्या फुलांचा घाट्यात सौदा, आवकनुसार ठरले फुलांचे दर

शेतकऱ्यांना ‘तारले’ शेतीमाल ‘तारण’ योजनेने, मराठवाड्यात सोयाबीन साठवणूकीवर भर