शेतकऱ्यांना ‘तारले’ शेतीमाल ‘तारण’ योजनेने, मराठवाड्यात सोयाबीन साठवणूकीवर भर

शेतीमालाच्या साठवणूकीवर कर्ज दिले जाते अशी काही योजना असते याबाबत शेतकरी अनभिज्ञ होते. मात्र, वेळ आल्यावर त्या बाबीची माहिती करुन घेतली जातेच अगदी त्याप्रमाणेच आता शेतीमाल तारण योजनेचे होत आहे. यंदा खरिपातील सोयबीनला दर नाहीत शिवाय गेल्या काही दिवसांपासून दिवाळीमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या बंद आहेत. त्यामुळे शेतकरी आता शेतीमाल तारण योजनेचा लाभ घेत आहेत.

शेतकऱ्यांना 'तारले' शेतीमाल 'तारण' योजनेने, मराठवाड्यात सोयाबीन साठवणूकीवर भर
संग्रहीत छायाचित्र

लातूर : शेतीमालाच्या (Agricultural Mortgage Scheme) साठवणूकीवर कर्ज दिले जाते अशी काही योजना असते याबाबत (Farmer) शेतकरी अनभिज्ञ होते. मात्र, वेळ आल्यावर त्या बाबीची माहिती करुन घेतली जातेच अगदी त्याप्रमाणेच आता शेतीमाल तारण योजनेचे होत आहे. यंदा खरिपातील (Kharif Season) सोयबीनला दर नाहीत शिवाय गेल्या काही दिवसांपासून दिवाळीमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या बंद आहेत. त्यामुळे शेतकरी आता शेतीमाल तारण योजनेचा लाभ घेत आहेत. गेल्या वर्षापर्यंत नेमकी ही योजना काय आहे याची माहीती नव्हती पण यंदा वखार महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनेत शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. यातून कोट्यावधींची उलाढाल झाली आहे. विशेष: मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी लाभ घेत आहेत.

या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा तसेच ही योजना काय आहे याची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी वखार महामंडळाने 15 जिल्ह्यांमध्ये जनजागृतीचा अभिनव उपक्रम राबलेला होता. त्यामुळे जनजागृती तर झालीच आहे शिवाय शेतकऱ्यांवर ही वेळ आल्याने शेतीमाल तारण योजनेला महत्व प्राप्त झाले आहे.

गेल्या 8 दिवसांमध्ये 3 कोटी 25 लाखाची उलाढाल

लातूर बाजार समितीच्या शेतीमाल तारण योजनेत 174 शेतकऱ्यांनी 6523.40 क्विंटल सोयाबीन तारण ठेवले असून, शेतकऱ्यांनी जवळपास 2 कोटी 59 लाख रुपये उचल घेतली आहे. उपबाजार पेठ-मुरूड येथे 1000 टनांचे नवीन गोडाउन बांधले असून, तेथे 68 शेतकऱ्यायांनी 2226.72 क्विंटल सोयाबीन तारण ठेवले आहे. त्यावर शेतकऱ्यानी जवळपास 69 लाख रुपये उचल घेतली आहे. एकूण 242 शेतकऱ्यांनी 8750 क्विंटल शेतीमाल तारण ठेवून 3 कोटी 29 लाख 54 हजार 130 रुपये रक्कम उचल घेतल्याची माहिती बाजार समितीचे बिरजदार यांनी दिली आहे.

योग्य वेळी योग्य मोबदला

या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यास शेतीमालाच्या चालू बाजार भावाच्या 75 टक्के रक्कम ही केवळ 6 टक्क्याने वापरता येणार आहे. त्यामुळे चांगला दर मिळेपर्यंत मालाची निगराणीही होते शिवाय योग्य दर मिळताच त्याची विक्रीही करता येते. या शेतीमाल तारण योजनेचे महत्व यंदा निर्माण झालेल्या परस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. यामध्ये वाढच होत जाणार असा विश्वास व्यक्त होत आहे. सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतीमाल तारणच्या बदल्यात पैसे दिले जात आहेत. जर असाच साठा वाढत राहिला तर वखार महामंडळाकडूनही पैसे घेतले जातील पण शेतकऱ्यांची गैरसोय होऊ दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

शेतमालाचे प्रकारानुसार कर्जवाटप व व्याजदर

1.शेतमाल प्रकार : सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडिद, भात , करडई, मुग, हळद, चना या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

2. शेतमाल प्रकार : मका,ज्वारी, गहू, बाजरी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

3. शेतमाल प्रकार : काजू बी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

4. शेतमाल प्रकार : बेदाणा या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

संबंधित बातम्या :

खरीप उत्पादनापेक्षा गांजा शेतीची राज्यात चर्चा, शेतकऱ्यांवर ही वेळ का आली?

रब्बीतही संकटाची मालिका : पेरलं पण उगवलंच नाही

…अखेर ‘तो’ बरसलाच; रब्बीसाठी पोषक, खरिपाचे मात्र नुकसानच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI