AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रब्बीतही संकटाची मालिका : पेरलं पण उगवलंच नाही

ग्रामीण भागात असं म्हणंल जात की, पेरंल तेच उगवंत पण शेतकऱ्यांच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. सर्वकाही नुकसानीचे घडत आहे. यापूर्वी खरीप हंगामातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले होते. खरिपातील नुकसान रब्बीत भरुन काढू असा विश्वास शेतकऱ्यांना होता पण मराठवाड्यातील अनेक भागात पेरणी झाली आहे पण पिकांची उगवणच झाली नसल्याचे चित्र आहे.

रब्बीतही संकटाची मालिका : पेरलं पण उगवलंच नाही
रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी झाली आहे पण उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी उगवणच झाली नाही
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 10:39 AM
Share

लातूर : ग्रामीण भागात असं म्हणंल जात की, पेरंल तेच उगवंत पण शेतकऱ्यांच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. (Marathwada Farmer) सर्वकाही नुकसानीचे घडत आहे. यापूर्वी (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले होते. खरिपातील नुकसान रब्बीत भरुन काढू असा विश्वास शेतकऱ्यांना होता पण मराठवाड्यातील अनेक भागात पेरणी झाली आहे पण पिकांची उगवणच झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरिपात अंतिम टप्प्यात ओढावलेले संकट रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच जाणवू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल का हा प्रश्न आहे.

(Heavy Rain)पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांना महिन्याभराचा विलंब झाला आहे. मात्र, पोषक वातावरणामुळे उशिरा पेरा झाला तरी उत्पादनावर काही फरक पडणार नाही असे चित्र होते. त्यामुळे पुर्वमशागत करुन शेतकऱ्यांनी थेट चाढ्यावर मूठ ठेवली. वेळेत पेरणी झाली तर उत्पादकता वाढेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, पहिल्या पेऱ्यातील ज्वारी, हरभरा, गहू या पिकांची उगवणच न झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. विशेष: मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

नेमकी कशामुळे उगवण झाली नाही

राज्यात 15 ऑक्टोंबरपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले तरी रब्बीसाठी पोषक वातावरण मानले जात होते. मात्र, पेरणीला उशीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केवळ हलक्या प्रकारची मशागत करुन पेरणीला सुरवात केली. शेतजमिनीमध्ये ओल होती मात्र, अधिकच्या पावसाने शेत जमिन ही आवळून आली होती. म्हणजेच जमिनीत ओलावा होता पण जमिनीत गाढलेल्या बियाणांची वाढ होईल अशी परस्थिती नव्हती त्यामुळे मशागत करुन शेत न ओलावता ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या पिकांची उगवणच झाली नव्हती. तर काही शेतकऱ्यांचे कोरड्या क्षेत्रावरील पिकांची उगवण ही झालेली नाही.

काय आहे पर्याय?

राज्यात सर्वत्रच रब्बी हंगामातील पेरणीचा श्रीगणेशा झाला आहे. मात्र, यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरंल की उगवणार हा गैरसमज शेतकऱ्यांनी दूर करणे गरजेचे आहे. कारण अधिकच्याच पावसामुळे शेत हे भुसभुशीत राहिलेले नाहीत तर आवळून आलेले आहेत. त्यामुळे पेरणीपूर्व मशागत त्यानंतर ते शेत ओलवूनच पेरणी केली तर पिकाची उगवण होणार आहे. अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केलेली नाही. त्यामुळे पेरणीची गडबड केली तर वेळ आणि पैसाही वाया जाणार आहे. त्यामुळे जमिनीची मशागत आणि त्यानंतरची ओल हीच महत्वाची राहणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

अवकाळी पावसामुळे दिलासा

बुधवारी सायंकाळी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, या पवसामुळे खरिपातील कापसाचे नुकसान झाले तर रब्बी हंगामात ओल नसल्याने ज्या पिकांची उगवण झाली नाही त्याची उगवण होण्यास मदत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय अजून तीन दिवस मराठवाड्यात ढगाळ वातावरण तसेच पावसाची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवलेली आहे. (Picture of rabi season; Peranal but not rising, the situation in Marathwada)

संबंधित बातम्या :

…अखेर ‘तो’ बरसलाच; रब्बीसाठी पोषक, खरिपाचे मात्र नुकसानच

वैज्ञानिक पध्दतीने खरबूजाची लागवड केल्यास भरघोस उत्पादन, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पोषक वातावरण

शेत जमिनीची खातेफोड म्हणजे काय ? कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.