वैज्ञानिक पध्दतीने खरबूजाची लागवड केल्यास भरघोस उत्पादन, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पोषक वातावरण

शेती व्यवसयात हंगामी फळपिकांचेही महत्व वाढत आहे. जसे की टरबूज आणि खरबूज. या फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तर वाढ होत आहेच शिवाय खरबूजाचे तर विविध औषधी फायदेही आहेत. खरबूज हे अतिशय स्वादिष्ट आणि निरोगी फळ त्याच्या लागवडीचा कालावधी जवळ येत आहे. डिसेंबर ते मार्च या काळात लागवड केली जाते.

वैज्ञानिक पध्दतीने खरबूजाची लागवड केल्यास भरघोस उत्पादन, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पोषक वातावरण
खरबूज
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 7:08 PM

मुंबई : शेती व्यवसयात हंगामी फळपिकांचेही महत्व वाढत आहे. जसे की टरबूज आणि खरबूज. या फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तर वाढ होत आहेच शिवाय खरबूजाचे तर विविध औषधी फायदेही आहेत. (Melon Fruit Crop) खरबूज हे अतिशय स्वादिष्ट आणि निरोगी फळ त्याच्या लागवडीचा कालावधी जवळ येत आहे. डिसेंबर ते मार्च या काळात लागवड केली जाते. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये तर लागवड होतेच मात्र, (Maharashtra) महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये खरबूजाची लागवड होते हे विशेष आहे.

उन्हाळ्याच्या हंगामात नदीलगतच्या बागायत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात हे फळपिक घेतले जाते. खरबूजाचे फळ हे गोड असून त्यामध्ये काही जीवनसत्त्वे ए, बी, सी सारखी खनिजे असल्याने बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकरी त्याची चांगली लागवड करून चांगली कमाई करू शकतात.

जमीन आणि हवामान

मध्यम काळी आणि सिंचनाखालची शेतजमिन या पिकासाठी योग्य आहे. 5.5 ते 7 एम.एम मातीची पातळी या पिकांसाठी योग्य आहे.या पिकासाठी उष्ण आणि कोरडे हवामान आणि मुबलक सूर्यप्रकाश आवश्यक आहे. 24 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअस तापमान वेल वाढीसाठी पोषक आहे आहे. मात्र 18 अंश सेल्सिअस पेक्षा कमी किंवा 32 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान हे धोक्याचे आहे. त्याचा परिणाम वेलीच्या वाढीवर होतो.

खताचे प्रमाण

खरबूजाच्या लागवडीसाठी 90 किलो नायट्रोजन, 70 किलो फॉस्फरस आणि 60 किलो पोटाश हेक्टरी अशी मात्रा द्यावी. रासायनिक खतामध्ये निम्मी नायट्रोजन सामग्री आणि शेतात वाफे बनवताना फॉस्फरस आणि पोटॅशचे संपूर्ण प्रमाण दिले जाते. नायट्रोजनचे उर्वरित प्रमाण दोन समान भागांमध्ये विभागले गेले पाहिजे आणि उभ्या पिकातील मुळांजवळ पेरणी केल्यानंतर 20 आणि त्यानंतर 45 दिवसांनी हा डोस देणे गरजेचे आहे. 3 मिलीग्रॅम बोरॉन, कॅल्शियम आणि मॅलिब्डेनम हे प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर फळांची संख्या आणि एकूण उत्पन्नही वाढते.

खरबूज वाण आणि लागवडच

काशी मधु, हारा मधु, पंजाब सुनहरी आणि पंजाब हायब्रिड या वाणांची लागवड ही शेत उभे व आडवे नांगरून वाफे करुन लागवड करता येते. शेतात शेणखताची विस्कटणी केली तर उत्पादनात वाढ होते शिवाय पिकही जोमात वाढते. खरबूजांसाठी हेक्टरी 1.5 ते 2 किलो बियाणे पुरेसे आहे.

रोगांपासून संरक्षण करण्यासाठी उपाय

केवाडा – पानाच्या तळाशी पिवळे तपकिरी डाग दिसतात आणि नंतर पानांच्या देठांमध्ये आणि फांद्यांमध्ये पसरतात. याकरिता डिथेन झेड-78 ची फवारणी करून त्यावर नियंत्रण ठेवता येते. यामुळे फळांच्या माशांचे आणि पान किडीचेही नियंत्रण होते.

संबंधित बातम्या :

शेत जमिनीची खातेफोड म्हणजे काय ? कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या

सरकारच्या धोरणावरच ठरणार तुरीचे दर, शेतकऱ्यांना आशा हमीभाव केंद्राची

गळीत हंगामाला सुरवात मात्र, थकीत ‘एफआरपी’ रकमेचा मुद्दा कायम ; 43 कारखाने परवान्याच्या प्रतिक्षेत

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.