AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तर सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा

कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी आता केंद्र सरकार साठवणुकीतला कांदा बाहेर काढणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर हे कमी होणार आहेत. शेतीमालाच्या दरात केंद्र सरकारचा हस्तक्षेप असल्यानेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याची टीका आता शेतकरी नेत्यांकडून सरकारवर होत आहे.

केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तर सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 1:39 PM
Share

मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी (Central Government) केंद्र सरकारने आपला मोर्चा आता शेती उत्पादनाकडे वळविला आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र, नुकसान होणार आहे. ( Onion Prices) कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण  ( Onion Price Control) आणण्यासाठी आता केंद्र सरकार साठवणुकीतला कांदा बाहेर काढणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर हे कमी होणार आहेत. शेतीमालाच्या दरात केंद्र सरकारचा हस्तक्षेप असल्यानेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याची टीका आता शेतकरी नेत्यांकडून सरकारवर होत आहे.

देशभरात असलेल्या साठ्यातील कांदा विक्रीला काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे कमीत-कमी 5 रुपयांनी कांद्याचे दर हे कमी होणार आहेत. एकीकडे पावसामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कांद्याच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पण आता या निर्णयामुळे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

कांद्याच्या दरात कमालीची घसरण

13 ऑक्टोंबरला कांद्याला 43 रुपये किलोचा दर नाशिकच्या बाजारपेठेत मिळाला होता. यंदा पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे कांदा चाळीत साठलेल्या कांद्याला अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हा कांदा विक्रीसाठी काढला होता. मात्र, गेल्या महिन्य़ाभरात पुन्हा कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. 4300 वर गेलेला कांदा आता 2000 रुपये क्विंटलवर येऊन ठेपलेला आहे. असे असतानाच आता केंद्र सरकारने जर साठवणूकतला कांदा बाजारात आणला तर कवडीमोल दरानेच विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येणार असल्याचे कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी सांगितले आहे.

साठवणुकीतला कांदा बाजारात

कांद्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरात असलेल्या बाजारांमधील बफर स्टॉक कमी केला आहे. त्यामुळे 1.11 लाख टन कांदा आता बाजारात आला आहे. बाजारात कांद्याची आवक वाढल्यानं किलोमागे 5 ते 12 रुपयांनी दर कमी होणार आहेत. केंद्राकडे असलेला स्टॉक मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, चंदिगढ, कोच्ची आणि रायपूर यासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आणला गेला आहे. याशिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील स्थानिक बाजारांमध्येदेखील अधिकच्या कांद्याचा पुरवठा करण्यात आला आहे.

काय आहेत सध्या कांद्याचे दर

किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 40 रुपये किलो आहेत तर ठोक बाजारात 31 रुपये किलो असा दर आहे. साठवणूकीतला कांदा बाजारात आणून कांद्याचे दर स्थिर करण्यात येत असल्याची माहिती ग्राहक मंत्रालयानं दिली आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा स्वस्त झाला आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत बफर स्टॉकमधील 1,11,376.17 टन कांदा प्रमुख बाजारांमध्ये आणला गेला. त्यामुळे कांद्याच्या दरात किलोमागे ५ ते १२ रुपयांची घसरण झाली. (Central Government’s ‘This’ decision to control onion prices, relief to consumers)

संबंधित बातम्या :

दसऱ्यात तारले दिवाळीत मात्र, झेंडूच्या फुलांचा घाट्यात सौदा, आवकनुसार ठरले फुलांचे दर

शेतकऱ्यांना ‘तारले’ शेतीमाल ‘तारण’ योजनेने, मराठवाड्यात सोयाबीन साठवणूकीवर भर

खरीप उत्पादनापेक्षा गांजा शेतीची राज्यात चर्चा, शेतकऱ्यांवर ही वेळ का आली?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.