दसऱ्यात तारले दिवाळीत मात्र, झेंडूच्या फुलांचा घाट्यात सौदा, आवकनुसार ठरले फुलांचे दर

दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी झेंडूच्या हाराचे तोरण घराला लावून हा आनंद द्विगुणीत केला जातो. याकरिता झेंडूच्या फुलाला मोठी मागणी असते. त्याअनुशंगानेच शेतकरीही झेंडूची लागवड करीत असतात. दसऱ्यात झेंडूच्या फुलांना चांगले दर होते मात्र, पावसामुळे आणि वाढलेल्या आवकमुळे ते दर टिकून राहिले नाहीत उलट यामध्ये घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणने आहे.

दसऱ्यात तारले दिवाळीत मात्र, झेंडूच्या फुलांचा घाट्यात सौदा, आवकनुसार ठरले फुलांचे दर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 12:47 PM

लातूर : दसरा अन् दिवाळी (Diwali Festival) सणामध्ये झेंडूच्या (marigold flowers) फुलाचे महत्व आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी झेंडूच्या हाराचे तोरण घराला लावून हा आनंद द्विगुणीत केला जातो. याकरिता झेंडूच्या फुलाला मोठी मागणी असते. त्याअनुशंगानेच शेतकरीही झेंडूची लागवड करीत असतात. दसऱ्यात झेंडूच्या फुलांना चांगले दर होते मात्र, पावसामुळे आणि वाढलेल्या आवकमुळे ते दर टिकून राहिले नाहीत उलट (arrivals increased) यामध्ये घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणने आहे. शिवाय यंदा जशी आवक त्या प्रमाणात दर असेच चित्र सर्वत्र होते. मुख्य शहरांमध्ये अधिकचे दर होते तर ग्रामीण भागात कमी दरात फुलांची विक्री करावी लागली होती.

झेंडूच्या फुलांची मागणी ही काही कालावधीसाठीच मर्यादीत असते. ऐन सणामध्ये फुलांना चांगला दर मिळतो म्हणून मुख्य शेतीव्यवसायाला याची जोड दिली जाते. यामधून कधी फायदा तर कधी नुकसान असेच चक्र सुरु असते. यंदा मुख्य पिकांबरोबर इतर सर्वांवर अतिवृष्टीचा परिणाम झालेला आहे. झेंडूच्या झाडाचे नुकसान तर झालेच शिवाय पावसामुळे उत्पादनही घटले होते. ज्या शहरांमध्ये फुलाची आवक कमी झाली त्या ठिकाणी झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळाला आहे तर आवक वाढलेल्या शहरांमध्ये कवडीमोल दराने झेंडूच्या फुलांची विक्री करावी लागली होता.

झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा सजल्या पण

लक्ष्मीपूजन आणि त्यापाठोपाठ पाडवा असल्याने बुधवारपासूनच शहरी भागातल्या बाजारपेठा ह्या फुलांनी सजलेल्या होत्या. दसऱ्याप्रमाणेच झेंडूच्या फुलांना माफक दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. बुधवारी सकाळी आवक कमी असताना 100 ते 120 चा दर मिळाला पण दुपारनंतर झेंडूच्या फुलांची आवक वाढली आणि दर कमी झाले. संध्याकाळपर्यंत दर निम्म्यावरच आले होते. त्यामुळे माल परत घेऊन जाण्यापेक्षा मिळेल त्या दरात फुलांची विक्री ही सुरु होती. शिवाय ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने विक्रेत्यांच्या मनात पावसाचीही धास्ती होती.

अतिवृष्टीचा परिणाम झेंडूवर

मध्यंतरी अतिवृष्टीमुळे केवळ खरिपातील पिकांचेच नाही तर फळबागा आणि झेंडूच्या झाडांचेही नुकसान झाले होते. झेंडूची जोपासना करण्यासाठी एकरी 50 हजार रुपये खर्ची करुनही पदरी निराशच पडली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. दरवर्षी 50 हजाराच्या बदल्यात 1 लाख मिळतात. यंदा मात्र, उत्पादनावर केलेला खर्चही पदरी पडला नसल्याचे परळी येथील विक्रत्याने सांगितले. तर ज्या भागात आवक कमी तिथे दर अधिक तर जिथे आवक जास्त तिथे मात्र कवडीमोल दराने फुलांची विक्री करावी लागली आहे.

शहरांप्रमाणे झेंडूच्या फुलाचे दर

राज्यातील मुख्य शहरांमध्ये झेंडूचे दर योग्य प्रमाणात होते. मात्र, बुधवारी सायंकाळ पासून आवक वाढल्याने दरात कमी झाली. सकाळी सुरवातीला मुंबई- पुण्यात झेंडुच्या फुलांना 120 ते 150 रुपये किलोचा दर मिळाला होता. मात्र, त्यानंतर दरात कमालीची घट झाली. मुंबईत 100 ते 120, सांगली 100, कोल्हापूर 80 ते 100 रुपये, पुणे 50 ते 80, नागपूर 50 ते 60 तर औरंगाबाद 50 ते 60 तर सोलापूर 40 ते 60 अशाप्रकारे दरात वेगळेपण आढळून आले होते. (Fall in marigold flower prices, flower prices fixed inarrivals)

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांना ‘तारले’ शेतीमाल ‘तारण’ योजनेने, मराठवाड्यात सोयाबीन साठवणूकीवर भर

खरीप उत्पादनापेक्षा गांजा शेतीची राज्यात चर्चा, शेतकऱ्यांवर ही वेळ का आली?

रब्बीतही संकटाची मालिका : पेरलं पण उगवलंच नाही

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.