Pomegranate Orchard : तेल्याचा सामना करण्यापेक्षा डाळिंब बागा तोडलेल्या बऱ्या, का होत आहेत शेतकरी हतबल?

| Updated on: Jan 17, 2022 | 2:31 PM

फळबागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. हे कमी म्हणून की काय आता नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील डाळिंब बागावर तेल्या रोगाचा कायम प्रादुर्भाव राहिलेला आहे. या रोगावर काही पर्यायच नाही असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकीकडे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाचा धोका निर्माण झाला असतानाच दुसरीकडे फळबागांची तर तोडणी करण्याचीच नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावेलेली आहे.

Pomegranate Orchard : तेल्याचा सामना करण्यापेक्षा डाळिंब बागा तोडलेल्या बऱ्या, का होत आहेत शेतकरी हतबल?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नाशिक : दोन दिवसांपूर्वीच डाळिंब संघाने घोषणा केली आहे की, ( Pomegranate orchard) डाळिंब क्षेत्रामध्ये यंदा लक्षणीय घट झालेली आहे. सरासरीच्या केवळ 5 टक्केच नवी लागवड झालेली आहे. ही अशी अवस्था असताना दुसरीकडे आहे त्या बागा देखील कायम राहतील का नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. (Change in environment) वातावरणातील बदलाचा फटका कायम शेती पिकांना बसलेला आहे. यंदा तर त्याची अधिक तीव्रता जाणवलेली आहे. विशेषत: फळबागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. हे कमी म्हणून की काय आता नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील (Disease on pomegranate orchard) डाळिंब बागावर तेल्या रोगाचा कायम प्रादुर्भाव राहिलेला आहे. या रोगावर काही पर्यायच नाही असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकीकडे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाचा धोका निर्माण झाला असतानाच दुसरीकडे फळबागांची तर तोडणी करण्याचीच नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावेलेली आहे. शेतकरी दुहेरी संकटात तर आहेच पण पदरी काहीच पडत नसल्याने हतबलही झाला आहे.

नेमका तेल्या आहे तरी काय?

वातावरणात बदल झाला की, सर्वात आगोदर परिणाम होतो तो फळबागांवर. त्याचप्रमाणे सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आणि पावसामुळे या तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तेल्या हा जीवाणूजन्य रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव एका डाळिंबाच्या झाडाला जरी झाला तरी अल्पावधीतच हा रोग संपूर्ण बाग क्षेत्राला कवेत घेतो. याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी परिणामकारक औषधच उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे तेल्याचा प्रादुर्भाव झाला शेतकरी आहे उत्पादन घेतात आणि थेट बागच तोडतात. वातावरणातील बदलामुळेच याचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केला मात्र, तेलही गेले अन्

पारंपारिक पिकांमधून उत्पादन वाढत नाही म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हे एकतर द्राक्ष बाग नाहीतर डाळिंब बागेचा प्रयोग करीत आहेत. पारंपारिक पिकांना फाटा देऊन अधिकचा खर्च करुन हे धाडस शेतकऱ्यांनी केले आहे. सुरवातीचा काही काळ चांगले उत्पन्न वाढले म्हणून बागांचे क्षेत्र वाढतच गेले आहे. पण गेल्या चार वर्षांपासून वातारणातील बदलामुळे याचा प्रादुर्भाव वाढत आहे. ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. याकरिता अनेक उपाययोजना केल्या तरी या रोगावर नियंत्रण येत नसल्यामुळे शेतकरी बागा तोडून टाकणेच पसंत करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Latur Market: सोयाबीन दरात चढ-उतार असतानाही विक्रमी आवक, काय आहेत कारणे?

Mango: आंबा लागवडीपासून ते काढणीपर्यंत ‘अशी’ घ्या काळजी, तरच उत्पादनात होईल वाढ

Chickpea: ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?